पहिल्या टप्प्यातील चाचणीचा परिणाम समोर; Made in india कोरोना लशीबाबत मोठी माहिती

पहिल्या टप्प्यातील चाचणीचा परिणाम समोर; Made in india कोरोना लशीबाबत मोठी माहिती

COVAXIN कोरोना लशीचं (corona vaccine) सध्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. आता या लशीच्या पहिल्या टप्प्यातील ट्रायलचा परिणाम समोर आला आहे.

  • Share this:

मुंबई, 16 डिसेंबर : स्वदेशी कोरोनाची लस  (corona vaccine) कधी येणार याकडे सर्वांचे डोळे लागलेले असतानाच आता भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) कोवॅक्सिन (COVAXIN) लशीबाबत मोठी माहिती समोर येते आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. आता या लशीच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा परिणाम समोर आला आहे. लशीचा सकारात्मक परिणाम दिसून आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता आशा पल्लवित झाल्या आहेत.

सप्टेंबरमध्येच कोवॅक्सिन लशीचं पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल झालं होतं. ज्याचा अंतिम परिमाण अधिकृतरित्या जाहीर करण्यात आला आहे.  कोवॅक्सिन किंवा BBV152 ही लस शरीरातील अँटिबॉडीजना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रेरित करत असल्याचं दिसून आलं आहे. शिवाय ही लस 2 ते 8 अंश सेल्सिअस तापमानात स्टोअर करता येऊ शकते. ज्यामुळे सरकारसमोर लस साठवण्याचं आव्हान नसेल. यामुळे लशीकरण मोहिमेअंतर्गत ही लस देशभरात सहजरित्या उपलब्ध करता येऊ शकते.

भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) - नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे.  शेवटच्या टप्प्यातील चाचणीचा डेटा हा सुरक्षित आणि यशस्वीरित्या पार पडल्यानंतर ही लस बाजारात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 2021च्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत ही लस नागरिकांना उपलब्ध होऊ शकेल असं कंपनीनं याआधी सांगितलं होतं.

हे वाचा - या कंपनीचा मोठा दावा! लक्षण नसणाऱ्यांवरही प्रभावी ठरणार कोरोना लस

दरम्यान भारत बायोटेकने लसीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यासंदर्भात अर्ज केला आहे. गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे आला आहे. पण सध्या तरी लशीला आपात्कालीन परवानगी देण्याबाबत विचार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी याआधी दिली होती.

हे वाचा - दिलासा! कोरोना चाचणी आता आणखी स्वस्त; पाहा CORONA TEST चे नवे दर

या लशीचं उत्पादन करण्यात आल्यानंतर सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच सरकारी रुग्णालयांना औषध पुरवणाऱ्या दुकानांना किंवा कंपन्यांना या लशीचा पुरवठा करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. या लशीची किंमत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

Published by: Priya Lad
First published: December 16, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading