मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

'त्यांचं' प्रेम कचरावेचकांनी जपलं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधून दिली लग्नातील अंगठी

'त्यांचं' प्रेम कचरावेचकांनी जपलं, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधून दिली लग्नातील अंगठी

जेम्स रॉस (James Ross) या ब्रिटिश नागरिकाने त्याच्या घरातील कचरा रिसायकलिंग सेंटरमध्ये (Household Waste Recycling Centre) देताना त्याची लग्नाची अंगठी कचऱ्याच्या कंटेनरमध्ये पडली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर तो जाम घाबरला

जेम्स रॉस (James Ross) या ब्रिटिश नागरिकाने त्याच्या घरातील कचरा रिसायकलिंग सेंटरमध्ये (Household Waste Recycling Centre) देताना त्याची लग्नाची अंगठी कचऱ्याच्या कंटेनरमध्ये पडली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर तो जाम घाबरला

जेम्स रॉस (James Ross) या ब्रिटिश नागरिकाने त्याच्या घरातील कचरा रिसायकलिंग सेंटरमध्ये (Household Waste Recycling Centre) देताना त्याची लग्नाची अंगठी कचऱ्याच्या कंटेनरमध्ये पडली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर तो जाम घाबरला

पुढे वाचा ...

लंडन 22 फेब्रुवारी : रिक्षामध्ये राहून गेलेले लाखो रुपये, भंगारात सापडलेले जुने सोन्याचे दागिने प्रामाणिकपणे मालकाला परत करणारे रिक्षावाले, भंगारवाले यांच्या बातम्या पुण्यातल्या वृत्तपत्रांत छापून आल्या आहेत. भारतभरातही अशा अनेक घटना घडत असतील. नकळतपणे कचराकुंडीत टाकल्या गेलेल्या मौल्यवान वस्तू, कागदपत्रं, बिलं प्रामाणिकपणे परत करणारे अनेक कचरावेचक भारतातही आहेत. त्या वस्तुंचे मालक या प्रामाणिक व्यक्तींना योग्य बक्षीस देऊन त्यांचे आभारही मानतात. पण आजची बातमी आहे ब्रिटनमधली आणि ती ही व्हॅलेंटाइन डेची.

जेम्स रॉस (James Ross) या ब्रिटिश नागरिकाने त्याच्या घरातील कचरा रिसायकलिंग सेंटरमध्ये (Household Waste Recycling Centre) देताना त्याची लग्नाची अंगठी कचऱ्याच्या कंटेनरमध्ये पडली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच ही घटना घडल्यानंतर तो जाम घाबरला. आता बायकोला तोंड कसं दाखवायचं याचा विचार करून तो नाराज झाला. पण त्या रिसायकलिंग सेंटरमधील कचरावेचकांनी 10 फुटांचा कचऱ्याचा ढीग उपसून काढून त्याची अंगठी अवघ्या 20 मिनिटांत त्याला परत दिली, तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला.  इंडिया टुडेच्या वेबसाइटवर (India Today) याबाबतचं वृत्त देण्यात आलं आहे.

जेम्सला जेव्हा लक्षात आलं की त्याच्या हातातली अंगठी कचऱ्याच्या डब्यात पडली आहे, तेव्हा त्याने तातडीने त्या केंद्राच्या  वेबसाईटवर तक्रार नोंदवली. नॉर्थ टायनसाइड काउन्सिलच्या (North Tyneside Council) वतीने  ही साईट सूएझ रिसायकलिंग आणि रिकव्हरी यूकेच्यावतीने हाताळली जाते. काउन्सिलने आपल्या ब्लॉगची एक लिंक त्यांच्या फेसबूक पोस्टमध्ये शेअर करून ही बातमी दिली आहे.

या ब्लॉगमध्ये (Blog) जेम्स म्हणाला, ‘ मी  केराच्या डब्यात केर टाकत होतो. प्रचंड थंडीने माझे हात गारठले होते आणि कापतही होते. त्यातून हळूच अंगठी निसटली आणि केराच्या कंटेनरमध्ये पडली. त्या कंटेनरच्या कडेला लागल्यामुळे ती अंगठी हातातून निघाली का हे मी सांगू शकत नाही पण ती पडल्यावर माझं हृदय पिळवटून निघालं. मी पुढे निघून गेलो, एक महिला गाड्या तपासत होती तिला मी काय घडलं ते सांगितलं. त्या महिलेनी अगदी शांतपणे मला सांगितलं, चिंता करू नका मी कुणालातरी अंगठी शोधायला पाठवते. चार जणं आले. ते जवळजवळ 20 मिनिटं शोधत होते. मी आशाच सोडली होती आणि या चिंतेत होतो की व्हॅलेंटाईन डेला मी बायकोला कसं सांगू की लग्नाचीच अंगठी मी हरवली आहे.’

जेम्सनी असंही सांगितलं, की त्याला अंगठीच्या किमतीबद्दल अजिबात चिंता नव्हती पण त्या अंगठीवर त्याच्या बायकोच्या हातानं त्यांच्या लग्नाची तारीख लिहिलेली होती. 2009 मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. त्यामुळे जेम्ससाठी ती अंगठी अधिक मौल्यवान होती.

नंतर जेम्स म्हणाला, ‘ अचानक कचरावेचकांनी ती अंगठी शोधून काढली. तो अक्षरश: माझ्यासाठी माझे प्राण वाचवणाऱ्या दूताप्रमाणेच ठरला. त्यांनी त्यांच्या कर्तव्यापेक्षा पुढे जाऊन मदत केली. ते अगदी नम्रपणे वागले.’ या सेंटरचे सुपरवायझर फिल कूपर, अडम मॅग्रेगॉर आणि ब्रायन हेलेन्स यांच्यासह आणखी एकाने ती अंगठी शोधण्याचं काम केलं. कूपर म्हणाले, ‘ हे सगळं सकाळीच घडलं हे बरं झालं. जर ती अंगठी कचऱ्याच्या बॅगमध्ये पडली असती तर ती मिळणं अवघड झालं असतं. आम्ही जेव्हा ती अंगठी त्यांना परत केली तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.’

नॉर्थ टाइनसाइडच्या निर्वाचित महापौर नॉर्मा रेडफर्न सीबीई (North Tyneside Council Mayor) यांनीही या कचरावेचकांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, ‘आमचे कर्मचारी खूपच प्रेमळ आहेत आणि त्यांना रोमँटिक भावनांचीही जाणीव आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो.’ कुलरकोट्समध्ये आपल्या दोन मुली व पत्नीसोबत राहणारा जेम्स आनंदी आहे. तो म्हणाला, ‘ माझ्या बायकोचा आनंद गगनात मावेना. तिला पहिल्यांदा वाटलं की मी उगीचच खोटी रचलेली कथा सांगतोय. त्या कचरावेचकांचे मानावे तितके आभार कमी आहेत.’

First published:

Tags: London, Love story, Ring