Home /News /news /

Explained: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती पसरवतात अधिक प्रदूषण; पाहा या यादीत कोणाचं नाव?

Explained: जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती पसरवतात अधिक प्रदूषण; पाहा या यादीत कोणाचं नाव?

The concept of World Environment Day. The man's hand holds the earth in a plastic bag. In the blank for social advertising there is a place for the inscription.

The concept of World Environment Day. The man's hand holds the earth in a plastic bag. In the blank for social advertising there is a place for the inscription.

जगभरात हवा, पाणी, ध्वनी अशा विविध प्रदूषणांबाबत सतत चर्चा सुरू असते. प्रत्येक देश दुसऱ्या देशावर प्रदूषण फैलावत असल्याचा आरोप करत असतो. मात्र जगासमोर मोठं आव्हान उभं करणाऱ्या या प्रदूषणाला केवळ देश नाहीत, तर त्या देशांमधील अब्जाधीशही जबाबदार आहेत.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : जगभरात हवा, पाणी, ध्वनी अशा विविध प्रदूषणांबाबत (Pollution) सतत चर्चा सुरू असते. प्रत्येक देश दुसऱ्या देशावर प्रदूषण फैलावत असल्याचा आरोप करत असतो. मात्र जगासमोर मोठं आव्हान उभं करणाऱ्या या प्रदूषणाला केवळ देश नाहीत, तर त्या देशांमधील अब्जाधीशही (Billionaires) जबाबदार आहेत. अनेक अब्जाधीशांची अलिशान जीवनशैली सर्वाधिक कार्बन उत्सर्जन (Carbon Emission) करणारी आहे. कार्बन फूट प्रिंट म्हणजे काय : कोणतीही व्यक्ती, संस्था जेव्हा पर्यावरणासाठी धोकादायक ग्रीन हाऊस वायूचं उत्सर्जन करते तेव्हा त्याला कार्बन फूट प्रिंट म्हणतात. ग्रीन हाऊस गॅसमुळे (Green House Gas) जागतिक तापमान वाढ (Global Warming) आणि वातावरण बदलाचा (Climate Change) धोका वाढतो. तुमचं कार्बन फूट प्रिंट (Carbon Foot Print) तुमची जीवनशैली (lifestyle) पर्यावरणासाठी (Environment) किती घातक आहे, हे सांगते. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दररोज तुमच्या स्वतःच्या वाहनानं ऑफिसला जाता, तर तुमचे कार्बन फूट प्रिंट हे ऑफिसात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक आहे. कार्बन फूट प्रिंटचं मोजमाप कसं करतात : तुम्ही काय खाता इथपासून ते तुम्ही दररोजच्या आयुष्यात कोणत्या गोष्टींचा वापर करता यावरून तुमचे कार्बन फूट प्रिंट मोजलं जातं. किती कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन यावर कार्बन फूट प्रिंटचं प्रमाण ठरतं. सीओटूई (CO2e) हे परिमाण यासाठी वापरलं जातं. (वाचा : जणू स्वर्गच उतरला धरतीवर; हिमाच्छादित नायगाराची अचंबित करणारी दृश्यं!) जितक्या जास्त सुविधा तितकं जास्त प्रदूषण : जगातील अतिश्रीमंत व्यक्तींची जीवनशैलीचा अभ्यास करून त्यांच्या कार्बन फूट प्रिंटचं मोजमाप करण्यात आलं. या श्रीमंत व्यक्तींचं आयुष्य वैविध्यपूर्ण सुख सोयींनी सुसज्ज आहे. जेवढ्या जास्त सुविधा तेवढी कार्बन फूट प्रिंट अधिक जास्त असते. कोणता व्यावसायिक किती प्रदूषण पसरवत आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकदा अभ्यास करण्यात आला. तरीही त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक सुखसोयींची, जीवनशैलीची माहिती सार्वत्रिकरीत्या उपलब्ध नसल्याने याबाबतचे निष्कर्ष अगदी अचूक नाहीत. तरीही काही बाबी अगदी स्पष्टपणे आढळल्या आहेत. रशियातील व्यावसायिक आघाडीवर : जगात सर्वाधिक प्रदूषण पसरवणाऱ्या अब्जाधीशांमध्ये आघाडीचं नाव आहे ते रशियाच्या (Russia) रोमन अब्रामोव्हिकचं (Roman Abramovich). इस्त्रायलमध्ये राहून तेल आणि वायूच्या (Oil and Gas) व्यवसायातून या व्यक्तीने प्रचंड पैसा कमावला. तेल आणि वायू व्यवसाय हा सर्वाधिक प्रदूषण निर्माण करणाऱ्या व्यवसायांपैकी एक आहे. रोमन अब्रामोव्हिकचा 19 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय असून, लंडनचा अत्यंत अलिशान चेल्सी फुटबॉल क्लब (Chelsy Football Club) हा याच्या मालकीचा आहे. केवळ व्यवसायातूनच नव्हे, तर आपल्या दैनंदिन जीवनशैलीतूनही त्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण केलं आहे. द प्रिंटमध्ये आलेल्या माहितीनुसार, रोमन अब्रामोव्हिक याची जीवनशैली अत्यंत अलिशान असून, जगातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये त्याच्या इमरती आणि गोल्फ क्लब आहेत. त्याच्याकडे इक्लीप्स नावाचं एक मोठं जहाज आहे. तसंच एक बोइंग विमान आहे. त्यात एका वेळेला 30 माणसं जेवू शकतील अशी खास खोली आहे. याशिवाय एक जेट आणि दोन हेलिकॉप्टर्स आहेत. ज्यांचा तो सतत वापर करतो. वर्ष 2018 मध्ये या रोमन अब्रामोव्हिक यानं 33 हजार 859 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन केलं आहे. (वाचा कचरा वेचणाऱ्या भावांचा Viral Video फक्त शेअर करून थांबले नाहीत आनंद महिंद्रा... ) बिल गेटस (Bill Gates) यांचाही या यादीत समावेश आहे. 2018 मध्ये त्यांचा कार्बन फूट प्रिंट 7 हजार 493 मेट्रिक टन होता. बिल गेटस यांनी आपल्या खासगी जेट विमानानं केलेल्या अनेक देशांच्या प्रवासामुळे हा कार्बन फूट प्रिंट वाढला. बिल गेटस यांच्याकडे चार खासगी जेट विमान, एक सीप्लेन यांसह अनेक हेलिकॉप्टर्सही आहेत. अंतराळ क्षेत्रात मोठं नाव कमावणाऱ्या एलन मस्क (Elon Musk) यांच्याबाबतीत मात्र एक वेगळीच बाब समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या मस्क यांची जीवनशैली (Lifestyle) साधी आणि निसर्गाशी जवळीक साधणारी आहे. आपल्याकडील सुविधांमुळे कमीत कमी प्रदूषण व्हावं याची ते काळजी घेतात. त्यांच्याकडे कोणतंही जहाज नाही. त्यांना सध्या सुट्टी घेण्यासाठी वेळच नसल्याचं ते सांगतात. 2018 मध्ये मस्क यांचा कार्बन फूट प्रिंट 2 हजार 84 मेट्रिक टन होता.  इतर मोठ्या व्यावसायिकांच्या विशेषतः अब्जाधीशांच्या तुलनेत खूपच कमी आहे.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Pollution

पुढील बातम्या