बँकॉक, 09 मे: नवरा-बायकोचं नातं इतकं घट्ट असतं
(Immortal Love Story) की एकाचं जाण्याचं दु:ख दुसऱ्याला स्विकार करणं कठीण होऊन जातं. 72 वर्षाच्या एका वृद्धासोबतही असंच काही घडलं आहे. 21 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. मात्र, त्या दोघांना एकमेकांपासून दूर जायचं नव्हतं. याच कारणामुळे त्यांनी आपल्या पत्नीच्या मृतदेह घरातच पुरला आणि ते त्या आपल्या पत्नीच्या मृतदेहासोबत राहिले.
(Husband Lived 21 Years With Wife’s Dead Body)
ही कहाणी आहे थायलंडमधील बँकॉक
(Thailand News) येथे राहणाऱ्या चार्न जैनवाचाकल या 72 वर्षीय वृद्धाची. त्यांची कहाणी जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल
(Viral On Social Media) झाली तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू आले. काही लोकांनी त्यांच्या प्रेमाला अमर प्रेम कहाणी म्हटले तर काही जणांनी त्यांना अंतहीन प्रेम करणारा व्यक्ती म्हटले.
मिररच्या अहवालानुसार, चार्न
(Charn Janwatchakal) यांनी आपल्या पत्नीच्या मृतदेहाला घरात ठेवले आहे. मृतदेह एका शवपेटीच्या आत होता. ते या घरात झोपायचे आणि पत्नीच्या मृतदेहाशी बोलायचे. द स्ट्रेट टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ते घरात वीजेविना अत्यंत वाईट अवस्थेत राहत होते. पाणीसुद्धा ते शेजाऱ्यांकडून घ्यायचे. चार्न यांनी त्यांच्या पत्नीला त्यांच्यासाठी जीवित आहे, असे गृहित धरले होते. मात्र, यासोबतच त्यांनी त्यांच्या पत्नीचा मृतदेह दाखलाही तयार करुन ठेवला होता. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही. त्यांच्या पत्नीचा मृत्यू 2001मध्ये आजारपणाने झाला होता.
मात्र, अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. याआधी सुद्धा 1933मध्ये फ्लोरिडामधील एका डॉक्टरने एका रुग्णाच्या मृतदेहाला स्वत:च्या घरात ठेवून घेतले होते. टीबी आजाराने ग्रस्त असलेल्या या रुग्णाला डॉक्टर वाचवू शकले नाही, याचे त्यांच्या मनात शल्य होते. त्यांना या रुग्णासोबत स्नेह झाला होता. शेवटी 1940मध्ये डॉक्टरने त्या रुग्णाचा मृतदेह घरातून घेऊन एका अज्ञातस्थळी दफन केला.
हे वाचा - Nail biting: मुलाला नखं चावण्याची सवय लागलेय का? या टिप्स वापरून बघा लगेच बंद करेल
मृतदेहांसोबत जगण्याचे मानसशास्त्र -
शेवटी लोक मृतदेहासोबत का राहतात? या प्रश्नावर काही अभ्यास करण्यात आले आहेत. जूली बेकच्या अहवालानुसार, जर मानवाची मूलभूत बाब मृतांची चिंता करणे असेल तर त्याचा दुसरा पैलू म्हणजे मृत्यूची भीती हा देखील आहे. इनवर्सच्या एका अहवालानुसार, मृतदेहांचे अस्तित्व हा आपल्या पुढे जाण्याच्या सिद्धांतात अडथळा आहे. या कारणास्तव त्यांचे अंत्यसंस्कार केले जातात. ज्यांना पुढे जाण्याची भीती वाटते ते मृतदेहांसोबत जगण्याची वृत्ती स्वीकारतात. माणसाचे मानसशास्त्र खूप गुंतागुंतीचे असते, अशा परिस्थितीत तो कोणता प्रसंग कसा स्वीकारतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.