मुंबई, 09 मे : नखं चावण्याची काही मुलांना फार वाईट सवय असते. सतत ती हात रिकामा असला की लगेच तोंडात घालून नखं चावत राहतात. काही पालक आपल्या मुलांची नखे चावण्याची सवय गांभीर्याने घेत नाहीत. तर काही पालकांना इच्छा असूनही मुलांची ही सवय सोडवता येत नाही. नखं चावण्याची, चघळण्याची सवय चांगली नसून ते खराबही वाटतं. तसेच, याचा मुलांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. तुमची इच्छा असल्यास काही युक्त्यांच्या मदतीने लहान मुलांची नखे चघळण्याची सवय सहज सुटू शकते. त्याविषयी (Nail biting) जाणून घेऊया. मुलांना नखे चघळताना पाहून बहुतेक पालक त्याकडे दुर्लक्ष तर करतात किंवा मुलांना फटकारतात आणि त्यांना नखे चघळण्यापासून थांबवतात. पण फटकारण्याचा परिणाम फार काळ टिकत नाही आणि काही वेळाने मुले पुन्हा नखे चघळायला लागतात. यावर काही वेगळे उपाय करण्याची गरज आहे, त्याविषयी माहिती घेऊया. नखे चावण्याचे दुष्परिणाम - अनेक तज्ज्ञांच्या मते, नखे चघळल्याने हातातील जंतू थेट मुलांच्या शरीरात जाऊन त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे मुले लवकर आजारी पडू शकतात. त्याचबरोबर नखे चघळण्याच्या सवयीमुळे मुलांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो आणि मुले तणावाखाली येतात. नखं कापणे सोपा उपाय - तुमच्या मुलाला नखे चावण्याची सवय असल्यास, नखे मोठी होण्यापूर्वीच वेळोवेळी कापत राहा. काही दिवस नखे चघळता न आल्याने मुले ही सवय विसरतात. कडू गोष्टींची मदत घ्या - मुलांना नखे चघळण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही काही कडू पदार्थाच्या रसाचीही मदत घेऊ शकता. कारल्याचा रस इत्यादी मुलांच्या नखांवर लावल्याने मुले तोंडात नखे घालणे टाळतील. हे वाचा - सकाळी होणाऱ्या एवढ्याशा चुकीमुळं अॅसिडिटी सगळा दिवस खराब करते; लवकर बदला सवय नखे स्वच्छ ठेवा - नखे चावण्याची सवय एका रात्रीत सुटू शकत नाही. साहजिकच मुलांना ही सवय सोडायला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मुलांची नखे स्वच्छ ठेवायला विसरू नका. त्यामुळे नखांमध्ये साचलेली घाण मुलांवर परिणामकारक ठरणार नाही. यासाठी तुम्ही मॅनिक्युअरचीही मदत घेऊ शकता. हे वाचा - मे महिन्यात जन्मलेल्या लोकांची असतात खास वैशिष्ट्ये; फक्त रागावर नियंत्रण ठेवा या गोष्टींपासून दूर राहा मुलांना नखे चावण्यास प्रवृत्त करणाऱ्या गोष्टींपासून मुलांना दूर ठेवा. यामुळे मुलाचे लक्ष नखेकडे जाणार नाही आणि ते नखे चावण्याचा प्रयत्न करणार नाहीत. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.