मुंबई, 03 मार्च: दुधात कॅल्शिअमचं प्रमाण जास्त असतं. पौष्टिक घटकांमुळे दूध पिणं हे आरोग्यासठी चांगलं असतं. प्रत्येक घरात दूधाची आवश्यकता भासतेच. कुणाला चहासाठी, कुणाला कॉफीसाठी तर कुणाला नुसतं दूध प्यायला आवडतं. रोज सकाळची सुरुवात ही दुधापासून होते. खेड्यांमध्ये अजूनही गायी-म्हशी पाळल्या जातात. त्यामुळे तिथे ताजं दूध मिळतं. परंतु शहरात राहणाऱ्यांना पिशवीबंद (milk packet) दुधाशिवाय पर्याय नाही. प्रत्येकजण आपल्या गरजेप्रमाणे डेअरीतून दूध घेऊन येतो; पण हे पिशवीचं दूध तुमच्यापर्यंत पोहोचतं, तोपर्यंत त्याच्यावर काय प्रोसेस होते ते माहिती आहे का? दूध विक्रेत्यांकडून दूध खरेदी केल्यानंतर डेअरी कंपन्या त्यावर कोणती प्रोसेस करतात, याबद्दलची माहिती घेऊ या.
सर्वांत आधी पशुपालकांकडून गावात एका ठिकाणी दूध संकलित केलं जातं. नंतर खेड्यापाड्यातून आणि लहान शहरांमधून दूध एकत्र केलं जातं. दूध गोळा करण्यापूर्वी त्यातलं फॅटचं प्रमाण तपासलं जातं आणि त्या फॅटच्या आधारे त्यांना पैसे दिले जातात. आता हे दूध एकत्र केल्यानंतर ते खराब होऊ नये, म्हणून थंड केलं जातं. एका विशिष्ट तापमानापर्यंत थंड केल्यानंतर हे दूध टँकरमध्ये भरलं जातं.
हे वाचा-कोटच्या बाहीवर 3 बटण का असतात माहितीये का? वाचा याची 2 अतिशय रंजक कारणं
अमूल (
Amul) कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, टँकरने हे दूध डेअरी प्लांटमध्ये (dairy plant) आणलं जातं. थंड केलेलं दूध आणणारे ट्रक उभे करण्याची विशेष व्यवस्था प्लांटमध्ये असते. त्यानंतर ट्रकमधून दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले जातात. त्यानंतर दुधाच्या सॅम्पलची नोंद ठेवली जाते. त्यात किती दूध कोणत्या दूध संघातून आलं आणि त्याची क्वालिटी काय आहे, याची नोंद ठेवली जाते.
सॅम्पल पास झाल्यानंतर टँकर अनलोडिंग स्टेशनला कनेक्ट केला जातो. यानंतर ते दूध कमी तापमानात ठेवलं जाते. यानंतर त्या दुधावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. सर्वप्रथम दुधाला प्री ट्रीटमेंट एरियामध्ये आणलं जातं. तिथं दुधातले बॅक्टेरिया (Bacteria in Milk) नष्ट करून दूध निर्जंतुक केलं जातं. नंतर दुधाचं पाश्चरायझेशन केलं जातं. या प्रक्रियेत सर्वांत आधी दूध गरम केलं जातं. नंतर थंड केलं जातं. सर्वप्रथम ते 72.5 डिग्री सेल्सियसपर्यंत गरम करून मग ते पूर्णपणे थंड केलं जातं. याव्यतिरिक्त, ते Hominization प्रक्रियेतून जातं. यामध्ये फायनल मॉल्युकोसची विल्हेवाट लावली जाते.
हे वाचा-जर सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर ‘हे’ उपाय करून पाहा
या सर्व प्रक्रिया झाल्यानंतर पॅकिंगचं (
packing of Milk) काम केले जाते. दुधाचं पॅकिंगही खास पद्धतीने केलं जातं. यामध्ये पॅकिंगसाठी प्रथम प्लास्टिकचा रोल लावला जातो आणि ऑटोमॅटिक मशीनद्वारे दूध पॅकिंग केलं जातं. या मशिन्सच्या मदतीने पॅक केलेलं दूध कॅरेटमध्ये जमा होतं. एका मिनिटात सुमारे 100 पॅकेट्स पॅक होतात. मग ती स्टोअरमध्ये ठेवली जातात. तिथे तापमान 5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असतं. जेव्हा ते सप्लायसाठी जातं, तेव्हाच ते बाहेर काढण्यात येतं. अशा प्रकारे सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर पिशवीबंद दूध आपल्यापर्यंत पोहोचतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.