Home /News /lifestyle /

कोटच्या बाहीवर 3 बटण का असतात माहितीये का? वाचा याची 2 अतिशय रंजक कारणं

कोटच्या बाहीवर 3 बटण का असतात माहितीये का? वाचा याची 2 अतिशय रंजक कारणं

सूट कोणीही घालो, पण प्रत्येक सूटमध्ये एक गोष्ट कॉमन असते. ती म्हणजे त्या सूटमधील कोटाच्या बाहीवर 3 बटणं असतात.

नवी दिल्ली 02 मार्च : जगभरातील लोक कोणत्याही खास प्रसंगी सूट (Suit) घालतात. लग्न (Wedding), पार्ट्या (Party), फंक्शन्समध्ये (Functions) तुम्ही अनेकदा मुलांना आणि पुरुषांना सूटमध्ये पाहिलं असेल. कॉर्पोरेटमध्ये तर रोज ऑफिसला (office) पण सूट घालून जातात. आजकाल सूट फक्त मुलं किंवा पुरुषच घालतात असं नाही. मुलीदेखील तुम्हाला सूट घालून दिसतील. सूट कोणीही घालो, पण प्रत्येक सूटमध्ये एक गोष्ट कॉमन असते. ती म्हणजे त्या सूटमधील कोटाच्या बाहीवर 3 बटणं (3 Buttons on Sleeves of Blazer) असतात. ही तीन बटणं का असतात याचं कारण तुम्हाला माहीत आहे का?. नसेल माहिती तर ही बातमी वाचाच.

जगातील सर्व अणुबॉम्बचा एकाचवेळी स्फोट झाल्यास पृथ्वीवर काय उरेल?

कोटच्या स्लिव्हवरील 3 बटणांमागे 2 कथा आहेत. पहिली लष्कराशी संबंधित आहे. त्यानुसार ब्रिटनची राणी एलिझाबेथ प्रथम आणि नेपोलियनसारख्या राजेशाही व्यक्तींनी पहिल्यांदा मिलिटरीसाठी (Blazers) ब्लेझर्स वापरण्याची पद्धत सुरू केली. (Military blazers were first introduced by royal figures such as Queen Elizabeth I and Napoleon) कोटाच्या बाहीवर 3 बटणं लावल्याने सैनिक तोंड, नाक पुसण्यासाठी बाहीचा वापर करणार नाहीत, असा त्यांचा विश्वास होता. घाणेरड्या बाह्यांमुळे त्यांचं हायजीन खराब होईल. दुसरीकडे त्यांचं इम्प्रेशन खराब होईल आणि कोणीही सैनिकांना घाबरणार नाही. तसंच यासोबतच सैनिक आपल्या गणवेशाचा आदर करायला शिकतील, असं त्यांना वाटलं होतं. या सगळ्या कारणांमुळे या मिलिटरी ब्लेझर्सच्या बाह्यांवर तीन बटणं लावण्याची पद्धत नेपोलियन किंवा राणी एलिझाबेथ प्रथम यांनी सुरू केली होती. आधी 3 बटणांचे हे होते फायदे दुसऱ्या कथेनुसार, त्या काळात कोट फक्त गणवेश म्हणून किंवा डेटवर जाण्यासाठी परिधान केले जात नव्हते. उलट, त्याकाळी पुरुष प्रत्येक परिस्थितीत दररोज कोट घालत असत. त्यामुळे जर कोटची बाही घट्ट असेल तर एखाद्याला जड काम करण्यासाठी तो काढावा लागायचा. कोट काढणं त्या काळात असभ्य मानलं जात होतं. त्यामुळे स्लिव्हची तिन्ही बटणं उघडल्याने कोट परिधान करूनही काम करणं सोपं झालं. कारण त्यावेळी कोटाच्या स्लिव्हमधली 3 बटणं केवळ दाखवण्यासाठीच नव्हती तर ती उघडताही येत होती.

तुमचे आजी-आजोबा कमी का झोपतात माहिती आहे का? संशोधकांनी सांगितलं कारण

आता फक्त फॅशनसाठी असतात कोटावरील तीन बटणं आजच्या फॅशनच्या (fashion) जगात कोटावरील तीन बटणं ही एक स्टाईल (style) बनली आहे. तिन्ही बटणं अजूनही सूटमधील कोटाच्या स्लिव्हवर असतात. पूर्वी कोट टेलर शिवायचे, त्यामुळे त्या बटणांसाठी काजं करायचे, जेणेकरून ते वापरता येतील. पण आता मोठ्या प्रमाणात कोट बनवताना या 3 बटणांसाठी काजं ठेवलं जात नाही. त्यामुळे ती बटणं केवळ शोपुरतीच उरली आहेत.
First published:

Tags: Viral news

पुढील बातम्या