मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जर सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर ‘हे’ उपाय करून पाहा

जर सतत थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल तर ‘हे’ उपाय करून पाहा

थकवा (Fatigue) सतत असल्यामुळे शरीर अशक्त (Weakness) होऊ लागतं आणि मग चिडचिडेपणा वाढू लागतो.

थकवा (Fatigue) सतत असल्यामुळे शरीर अशक्त (Weakness) होऊ लागतं आणि मग चिडचिडेपणा वाढू लागतो.

थकवा (Fatigue) सतत असल्यामुळे शरीर अशक्त (Weakness) होऊ लागतं आणि मग चिडचिडेपणा वाढू लागतो.

    मुंबई, 2 मार्च : सध्याच्या काळात माणसाचं आयुष्य (Life) इतकं बिझी झालं आहे की, स्वतःसाठी थोडा वेळ (Time) काढणंही कठीण झालं आहे. परिणामी वेगवेगळ्या शारीरिक-मानसिक समस्या जन्म घेत आहेत. सकाळी लवकर उठून (Early in the Morning) रात्री उशिरा झोपल्याने शांतपणे बसणंही दुर्मिळ झालं आहे. ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा आराम मिळत नाही. दिवसभर काम केल्यावर माणूस घरी येतो, तेव्हा त्याला फारच थकल्यासारखं वाटतं. थकवा (Fatigue) सतत असल्यामुळे शरीर अशक्त (Weakness) होऊ लागतं आणि मग चिडचिडेपणा वाढू लागतो. पण काही छोट्याछोट्या गोष्टींची काळजी घेऊन आपण स्वतःला या बिझी शेड्यूलमध्येही अ‍ॅक्टिव्ह (Active) आणि निरोगी (Healthy) ठेवू शकतो.

    1. जास्त पाणी प्या

    नेहमी बरेच जण जास्त पाणी पिण्यास टाळाटाळ करतात. कारण जास्त पाणी प्यायल्याने वारंवार वॉशरूमला जावं लागतं. पण यामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकली जातात. पण वॉशरूमला सतत जावं लागू नये म्हणून लोकं पाणी कमी पितात. हे तुमच्या शरीरासाठी खूप हानीकारक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुम्ही ऑफिसमध्ये किंवा घरी असलात तरी पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने तुमचं शरीर निरोगी आणि अ‍ॅक्टिव्ह राहील.

    2. पौष्टिक पदार्थ खा

    आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थ खाण्याची गरज असते. पण आपण पौष्टिकऐवजी बाजारात मिळणारं अरबट-चरबट खाणं पसंत करतो. ज्यामुळे आपल्या शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढतो. हेच जर तुम्ही पौष्टिक पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि प्रोटिनयुक्त पदार्थ खाल्ले तर तुम्ही निरोगी राहाल.

    वाचा : अजबच! फिट राहण्यासाठी नव्हे परफेक्ट लाइफ पार्टनरच्या शोधात जॉगिंग करते ही महिला

    3. सतत काम करू नका

    ऑफिस असो वा घर खूप वेळ बसून काम केल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर त्याचा परिणाम होतो. यामुळे कामादरम्यान मधेमधे ब्रेक घेत राहा आणि आपल्या शरीराला स्ट्रेच करत राहा. यामुळे तुमचं शरीर आखडणार नाही आणि सोबतच अ‍ॅक्टिव्ह राहील.

    4. नियमित व्यायाम करा

    जर तुम्हाला दिवसभर अ‍ॅक्टिव्ह राहायचं असेल तर नियमितपणे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. रोज एक तास व्यायाम केल्याने तुम्हाला दिवसभर थकल्यासारखं वाटणार नाही आणि तुम्ही निरोगीही राहाल.

    वाचा : शुगरची चिंता सोडा; 'या' पाच भाज्या खा आणि रक्तदाब ठेवा नियंत्रणात

    5. मोबाईल सोडा आणि भरपूर झोप घ्या

    असं नेहमी आढळून येतं की, दिवसभर कामाचा बोजा असल्यामुळे माणूस बिझी असतो. पण रात्री आडवं होताच मोबाइल पाहण्यात गुंग होतो. मोबाइल पाहतापाहता किती वेळ जातो, कळतही नाही आणि मग झोपेवर परिणाम होतो. त्यामुळे प्रयत्न करा की, रात्री झोपण्याआधी मोबाइल लांबच ठेवा आणि पुरेशी 7-8 तासांची झोप घ्या. यामुळे तुम्हाला अनेक आजार टाळता येतील.

    मग तुम्हालाही थकवा आणि अशक्तपणा सातत्याने जाणवत असल्यास वरील उपाय नक्की करून पाहा.

    First published:
    top videos

      Tags: Health, Health Tips, Lifestyle