Home /News /lifestyle /

किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना, आहारात करा 'हे' बदल

किडनी स्टोन रोखण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना, आहारात करा 'हे' बदल

पाण्याने प्रेशरने पोटात प्रवेश जातं तेव्हा, सर्व घाण मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीचं गंभीर नुकसान होतं. पाण्याच्या प्रेशरचा बायोलॉजिकल सिस्टीवर परिणाम होतो..

पाण्याने प्रेशरने पोटात प्रवेश जातं तेव्हा, सर्व घाण मूत्राशयात जमा होते, ज्यामुळे किडनीचं गंभीर नुकसान होतं. पाण्याच्या प्रेशरचा बायोलॉजिकल सिस्टीवर परिणाम होतो..

मूत्रपिंड किंवा मूत्रपिंडाचे दगड कचर्‍याच्या ढिगळ्यांशिवाय काही नसतात. मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात - मूत्रपिंडापासून मूत्राशय पर्यंत या कठोर स्फटिकासारखे ठेवी तयार होऊ शकतात.

मुंबई, 27 फेब्रुवारी : मुतखडा किंवा किडनी स्टोन (kidney Stone) हा मूत्रपिंडाशी (Renal) संबंधित अगदी सामान्य असा विकार आहे. या विकारात वेळेवर तपासणी केली तर कायमस्वरूपी नुकसान टाळता येऊ शकतं. तरीही तो विकार होऊच नये म्हणून काळजी घेणं महत्त्वाचं आहे. मुतखडा हा मूत्रपिंडातील एक प्रकारचा कचरा असतो. मूत्रपिंड ते मूत्राशयापर्यंतच्या मूत्रमार्गात कठिण स्फटिकासारखे खडे तयार होतात. हे खडे मूत्रमार्गातून सरकण्याचा अनुभव अत्यंत वेदनादायी असू शकतो. परंतु, योग्य निदान आणि औषधांमुळे या वेदना दूर केल्या जाऊ शकतात. मुतखडे होऊ नयेत, तसंच हा विकार बरा करण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शनाखाली करण्यासारखे अनेक उपाय आहेत. मुतखडा व्यवस्थापन (Kidney Stone Management) करण्यासाठी खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात 1)कॅल्शियमयुक्त आहार वाढवा : मुतखड्यांसाठी कॅल्शियम (Calcium) हा घटक वाईट ठरतो, असं सांगितलं जातं. मात्र हे सिद्ध झालं आहे, की आहारात पुरेशा प्रमाणात कॅल्शिअमचा समावेश केल्यास मुतखडा निर्मितीला प्रतिबंध होऊ शकतो. दूध, योगर्ट, चीज यांच्या सेवनाने ऑक्सलेटचा त्यांच्याशी संयोग होतो. त्यामुळे ऑक्सलेट शोषलं जाणं थांबतं. 2) मीठ, प्राणिज प्रथिनं घटवा : टेबल सॉल्ट, जंकफूड अथवा प्रक्रिया केलेले पदार्थ आहारातून कमी करून सोडियमचं (Sodium) सेवन कमी करावं. कारण सोडियममुळे मूत्रावाटे कॅल्शियम बाहेर टाकण्याचं प्रमाण वाढतं. प्राणिज प्रथिनं असलेल्या आहारात प्युरिन (Purin) असतं. त्याचं रूपांतर युरिक असिडच्या खड्यांमध्ये होते. त्यामुळे या आहारावर लक्ष ठेवणं, तो नियंत्रित ठेवणं आवश्यक आहे. 3) आहारात मॅग्नेशिअमचा वापर वाढवा : मॅग्नेशिअम (Magnesium) हा शरीरातील चयापचय क्रिया आणि ऊर्जा निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक आहे. यामुळे कॅल्शिअम ऑक्सलेट मुतखड्यांची निर्मिती थांबते. मॅग्नेशिअम पुरेशा प्रमाणात (किमान 420 mg/ प्रतिदिन) मिळण्यासाठी आहारात अॅव्होकॅडो, टोफू आणि शेंगांचा (कडधान्यांचा) मुबलक प्रमाणात समावेश करा. आपल्या शरीराचा चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी मॅग्नेशिअमयुक्त आणि ऑक्सलेटयुक्त आहार घ्या. मॅग्नेशिअम पुरेशा प्रमाणात असेल, तर आतड्यांमध्ये ऑक्सलेट शोषण कमी होते आणि मुतखड्यांची निर्मिती होत नाही.

4) सायट्रिक अ‍ॅसिडचा वापर वाढवा :

कॅल्शिअम ऑक्सलेट मुतखडे निर्मिती रोखण्यासाठी आहारात सायट्रिक अ‍ॅसिडचा (Citric Acid) वापर वाढवावा. लिंबू, संत्री यांसारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये सायट्रिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असतं. यामुळे कॅल्शिअम क्रिस्टलची बांधणी होऊन मुतखड्यांची वाढ थांबते आणि हे स्फटिक मूत्रमार्गाद्वारे निघून जातात.

(वाचा -   Weight Loss Tips: वजन कमी करताय? चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम)

5) हायड्रेशन योग्य असावं : मुतखडा विकारात हायड्रेशनसारखा (Hydration) म्हणजे विपुल प्रमाणात पाणी पिण्यासारखा दुसरा उपयुक्त पर्याय नाही. द्रवपदार्थांच्या वापरामुळे मुतखड्यांची निर्मिती करणारे पदार्थ पातळ होतात. मुतखडा होऊ नये यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं किंवा ज्यूस, दूध, सूप, किंवा हर्बल टीचं सेवन करणं आवश्यक आहे. मुतखडा विकारात सोडा, कृत्रिमरीत्या तयार केलेले गोड पदार्थ, साखरयुक्त पेयं आणि कोला यांचं सेवन करणं टाळावं.
Published by:news18 desk
First published:

Tags: Calcium, Health, Lifestyle, Renal, Wellness

पुढील बातम्या