मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips: वजन कमी करताय? चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम

Weight Loss Tips: वजन कमी करताय? चुकूनही खाऊ नका ही फळं, होईल उलटा परिणाम

नाश्त्यामध्ये जास्त प्रोटीन खाल्लं तर त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.

नाश्त्यामध्ये जास्त प्रोटीन खाल्लं तर त्यामुळे वजन कमी करण्यात मदत होते.

Weight Loss Tips in Marathi: शास्त्रीय पद्धतीनं वजन कमी केल्यास ही प्रक्रिया अतिशय सोपी असते. मात्र काय केलं नाही पाहिजे हे कळणं महत्त्वाचं.

मुंबई, 26 फेब्रुवारी : वजन कमी करायचे असेल तर बहुतांश लोक जास्तीतजास्त फळं खाण्यावर भर देतात. आपल्याला वाटतं, की रोजच्या जेवणात फळं असतील तर वजन लवकर कमी होईल. (fruits for weight loss) मात्र हा समज चुकीचा आहे.

काही गोष्टींकडे लक्ष न दिल्यास  तुम्ही खाण्यावर काटेकोर नियंत्रण ठेवलं तरी डायटची सगळी मेहनत पाण्यात जाते. (diet food) अनेकदा योग्य फळांची निवड न करणं हेसुद्धा याचं कारण असू शकतं. आपण अनेकदा नकळत डायटिंग करताना अशी फळं रोजच्या जेवणात खातो, जी खूप कॅलरीज अर्थात उष्मांकांनी युक्त असतात. (weight loss tips)

यामुळं दिवसभर वर्कआउट आणि व्यायाम करून गमावलेल्या कॅलरीज पुन्हा या फळांमुळे शरीरात जातात. तुम्ही डायटिंगचा प्लॅन बनवत असाल तर आधी योग्य फळांची निवड करा. वजन कमी करताना ही अयोग्य फळं कुठली ते समजून घ्या. (fruits not to eat in weight loss)

हेही वाचा रात्री झोपेतही वजन कमी करायचंय? ही पाच पेयं आहेत अतिशय प्रभावी, दिसेल फरक

केळी

केळी सुपर फूडच्या कॅटेगरीत येते. केळी आरोग्यासाठी खूप चांगली असते. मात्र तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर केली खाण्याआधी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. केळी खूप कॅलरीजनी युक्त असतात. केळीत प्राकृतिक गोडवा असतो. एका केळीत जवळपास 150 कॅलरीज असतात. हे जवळपास 37.5 कर्बोदकांएवढं आहे. तुम्ही रोज दोन ते तीन केळी खात असाल तर यातून तुमचं वजन नक्कीच वाढेल. दिवसभरात केवळ 1 केळी तुमच्यासाठी पुरेशी आहे.

मनुके

असं म्हटलं जातं, की एक ग्रॅम मनुक्यांमध्ये अंगूरपेक्षा जास्त कॅलरी असते. एक कप मनुक्यांमध्ये 450 हून जास्त कॅलरीज असतात. यातून नक्कीच तुमच्या वजनावर परिणाम होऊ शकतो. यातून सगळे प्रयत्न करूनही तुम्ही वजन कमी करू शकणार नाही.

एव्होकॅडो (Avocado)

एव्होकॅडो हे एक असं फळ आहे ज्यात हाय कॅलरीज असतात. या फळात 100 ग्रॅममध्ये जवळपास 160 कॅलरीज असतात. यात हेल्दी फॅट्ससुद्धा असतात. हे जास्त खाल्ल्यानं तुमचं वजन वाढू शकतं.

हेही वाचा फिश रेसिपी : एकदम टेस्टी आणि हेल्दी, असा बनवा कुरकुरीत मसाला Fish Fry

आंबा (Mango)

एक कप आंब्याच्या तुकड्यात 99 कॅलरीज असतात. यांच्या सिंगल सर्व्हिंगमध्ये तुम्ही 25 ग्रॅम कर्बोदकं आपल्या शरीरात घेता. यात जवळपास 23 ग्रॅम नैसर्गिक साखर आणि जवळपास 3 ग्रॅम फायबर असतं. अशावेळी आंबा खा पण मर्यादित नाहीतर तुमचं वजन वाढेल.

(डिस्क्लेमर - या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. news 18 Lokmat यांना दुजोरा देत नाही. याची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ञाशी संपर्क करा.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Weight loss tips, Wellness