• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मुलांना Nutritional Drinks देताय; पण खरंच याचा काही फायदा होतो का?

मुलांना Nutritional Drinks देताय; पण खरंच याचा काही फायदा होतो का?

तुम्ही तुमच्या मुलांना न्यूट्रिशनल ड्रिंक देत असाल तर आधी हे वाचा.

  • Share this:
मुंबई, 11 सप्टेंबर : आजकाल लहान मुलांना पुरेशा प्रमाणात पौष्टिक घटक मिळावेत, यासाठी पालक त्यांना बाजारात उपलब्ध असणारी कॉम्प्लान, बूस्ट, बोर्नव्हिटा यांसारखी पौष्टिक पेयं (Nutritional Drinks) दुधात मिसळून पिण्यास देतात. खरं तर आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीत लहान मुलांना देता येतील असे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांतून त्यांना आवश्यक पौष्टिक घटक सहजपणे मिळू शकतात. तरीदेखील बाजारात उपलब्ध असलेली न्यूट्रिशनल ड्रिंक्स लहान मुलांना (Nutritional Drinks for Children) देण्याकडे पालकांचा कल असतो. परंतु, खरंच या पेयांमधून लहान मुलांचं पोषण होतं का (Nutritional Drinks benefits), ही पेयं मुलांना सहजपणे पचतात का, अशी पेयं वयाच्या कितव्या वर्षानंतर मुलांना द्यावीत, असे अनेक प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. या न्यूट्रिशिनल पेयांमध्ये प्रीबायोटिक फायबर्स (Prebiotic Fiber) असतात. यामुळे लहान मुलांची पचनसंस्था चांगली होण्यास मदत होते. यामुळे लहान मुलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यात Vitamin A, B2,B9, B12, D आणि आयर्न, झिंक, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे घटक असतात. या सर्व गोष्टी लहान मुलांच्या वाढीसाठी पूरक असतात. बोर्नव्हिटा, कॉम्प्लान किंवा हॉर्लिक्सची चव लहान मुलांना आवडते. त्यामुळे ती आवडीनं दूध (Milk) पितात. त्यातून लहान मुलांना आवश्यक पोषक तत्त्वं आणि उष्मांक दिले जातात. यामुळे त्यांना अन्य कोणताही आहार देण्याची गरज भासत नाही. या न्यूट्रिशनल पेयांमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमचं प्रमाण मुबलक असतं. त्यामुळे लहान मुलांना दात येण्यास फायदा होतो. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारांपासून त्यांचा बचाव होतो. हे वाचा - शरीरातील 'या' पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे शिरा होऊ शकतात निकामी या पेयांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज पदार्थ असतात. त्यांचं योग्य प्रमाण मुलांच्या विकासासाठी पूरक ठरतं. जागतिक आरोग्य संघटनेने पोषणासंबंधी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लहान मुलांच्या निकोप वाढीसाठी आयर्न, झिंक, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 12 यांचा समावेश असलेली विविध प्रकारची प्रथिनं आणि मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज असते. त्यामुळे दुधात बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन किंवा हॉर्लिक्स मिसळून दिल्यास त्यातून त्यांना ही पोषक तत्त्वं सहजपणे मिळतात. हे वाचा - बदाम खाण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे; जाणून घ्या जाणकारांच्या म्हणण्यानुसार, 2 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लहान मुलांना अशी न्यूट्रिशियस पेयं देऊ नयेत. त्यातली काही व्हिटॅमिन्स किंवा अन्य घटक पदार्थ 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लहान मुलांसाठी असुरक्षित असतात. या वयाच्या मुलांची किडनी (Kidney) आणि लिव्हर (Liver) अशी पेयं पचवण्यासाठी सक्षम झालेलं नसतं. त्यामुळं 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अशी बाजारातली न्यूट्रिशियस पेय देणं टाळावं.
First published: