दिल्ली, 9 सप्टेंबर : हल्ली लोकांना बादाम (Almond) खाणे फार आवडते. काही लोक बदामाला भिजून खातात तर काही त्यावरील साल काढून खातात. कारण बदामात अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. जसे की फायबर, प्रोटीन, विटामिन ई, मॅग्नेशियम, मॅगनीज, कॉपर आणि फॉस्फरस मिळवण्यासाठी बदाम हा अतिशय महत्वाचे अन्नपदार्थ आहे. आता या पद्दतीने आपल्या आरोग्याला काही धोका आहे का? आणि आहे काय नेमका तोटा आहे, यातून आपल्या शारिरीक आरोग्याला काय हानी होऊ शकते. याची माहिती आपण घेऊयात. लढ्ढपणामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींना आणि ह्रदयविकाराचा (Heart disease) धोका असलेल्या लोकांनाही बदाम हे उपयुक्त आहे. त्यामुळे ते आवडीने खाल्ले जाते. एका संशोधनानूसार जर व्यक्ती चांगल्या पद्धतीने बदाम आणि शेंगा खात असेल तर त्याला कर्करोग (Cancer) होण्याचा धोका कमी असतो. त्यामुळे यात वैद्यकीय गुण असल्याचेही या संशोधनातून समोर आले आहे. Antioxidants ची मात्रा वाढते सातत्याने बदाम आहारात आले तर शरिरात (Antioxidants) ची मात्रा वाढते. त्याचमुळे ब्लड प्रेशरही कमी होते. डायबिटीजने ग्रस्त असणाऱ्या रूग्णांनाही बदाम खाण्याचा फायदा होतो. जर तुम्ही रात्रबर भिजलेले बदाम खात असाल तर तुम्हाला याचे अनेक फायदे होतात. तिशीच्या उंबरठ्यावरच्या नक्की फॉलो करायला पाहिजेत ऐश्वर्याच्या 4 ब्युटी टिप्स अन्नपचनासाठी फायदेशीर बदाम भिजून खाल्यामुळे अन्नपचन हे अतिशय उत्तमरित्या होते, बदामाला भिजवल्याने ते अधिक मुलायम आणि मऊ होतात. अन्नपचन प्रक्रियेत याचा फायदाही होतो. त्यामुळे भिजून खाल्लेले अन्नपदार्थ कधीही फायदेशीरच ठरतात. बदामातून मिळते न्यूट्रिशन बादामाला भिजवून खाल्ल्याने शरिराला न्यूट्रिशन मिळते. बदामात असणाऱ्या (Antioxidants) मुळे फायबर वाढतात. त्यामुळे बदाम खाणे आरोग्यासाठी फायदेशीरच ठरतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.