मराठी बातम्या /बातम्या /heatlh /पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे शिरा होऊ शकतात निकामी; म्हणून 'अशी' घ्याल आरोग्याची काळजी

पोषकतत्वांच्या कमतरतेमुळे शिरा होऊ शकतात निकामी; म्हणून 'अशी' घ्याल आरोग्याची काळजी

शरीरात पोषकतत्वांची कमी असेल तर याचा परिणाम हा आपल्या शरीरातील शिरांच्या आरोग्यावर होतो. शिरा (Nervous System) या आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असतात.

शरीरात पोषकतत्वांची कमी असेल तर याचा परिणाम हा आपल्या शरीरातील शिरांच्या आरोग्यावर होतो. शिरा (Nervous System) या आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असतात.

शरीरात पोषकतत्वांची कमी असेल तर याचा परिणाम हा आपल्या शरीरातील शिरांच्या आरोग्यावर होतो. शिरा (Nervous System) या आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असतात.

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : उत्तम आरोग्यासाठी पोषकतत्वांनी (Nutrients) भरपूर असा आहार घेणे आवश्यक असते. त्यामुळे शारिरीक आणि मानसिक विकासाकरिता शरीराला योग्य प्रमाणात न्यूट्रीशन (Nutrition) मिळणे आवश्यक असते. बदललेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोकांच्या आहारात बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. त्यामुळे लोकांना अनारोग्याचा सामना करावा लागत आहे. जर आपल्या शरीरात पोषकतत्वांची कमी असेल तर याचा परिणाम हा आपल्या शरीरातील शिरांच्या आरोग्यावर होतो. शिरा (Nervous System) या आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग असतात. शरीरात सतत रक्त वाहतं ठेवणे आणि शरीरातील इतर अंगभागाशी संपर्क बनवून ठेवण्याचे काम या शिरा करत असतात. त्यामुळे शिरा निरोगी राहणं फार महत्वाचे आहे.

शिरांच्या आरोग्यासाठी Vitamin B गरजेचे

भारतातील 12 शहरांमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात अशी माहिती समोर आली आहे की 60 टक्के लोकांना हे नर्व हेल्थबाबत काहीच माहिती नव्हती. मुंबई हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये न्यूरोलॉजी विषयाचे विभागप्रमुख डॉ. सतिश खाडीलकर याबाबत बोलताना म्हणाले की, शिरांचे आरोग्य हे केवळ Vitamin B च्या कमतरतेमुळे ढासळते. न्यूरोट्रॉपिक बी विटामिन (neurotropic-B vitamins) हे शरीरातील शिरांना आरोग्यदायी ठेवण्यास मदत करते.

बदाम खाण्याचे काय आहेत फायदे आणि तोटे; जाणून घ्या

Vitamin B ची कमतरता ही असंतूलित आहारामुळे होते. या संशोधनात अजून एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे लोक धमन्या (blood vessels) आणि शिरा यात फरक करत नाही. फक्त 38 टक्के लोकांनाच शिरा आणि धमन्यांमधला फरक करता आला आहे. त्यामुळे शिरांचे आरोग्य राखण्यात लोक अपयशी ठरत आहे. शिरांचे आरोग्य राखण्यासाठी आणि Vitamin B मिळवण्यासाठी दूध, चीज आणि मासे खाणे आवश्यक आहे. हा संतुलित आहार शिरांचे आयुष्य वाढवते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Vitamin D