MRI दरम्यान एक छोटीसी चूक बेतू शकते जीवावर, वेळीच व्हा सावध!

MRI दरम्यान एक छोटीसी चूक बेतू शकते जीवावर, वेळीच व्हा सावध!

सर्वातआधी हे समजू घेणं आवश्यक आहे की या मशीनच्या सहाय्याने रुग्णाला नक्की कोणता रोग झाला हे समजून घ्यायला मदत होते. याला तुम्ही एक्स-रेचे (X-Ray) पुढील व्हर्जनही म्हणू शकता.

  • Share this:

एमआरआय टेस्टमध्ये (MRI Test) जीवाला धोका असू शकतो का? हा प्रश्न सध्या ऐरणीवर येण्याचं मुख्य कारण म्हणजे हरियाणा मधील पंचकूला येथे एका वयोवृद्ध माणसाने एमआरआय टेस्ट दरम्यान श्वासोश्वास अडकल्यामुळे बेल्ट तोडून मशीनच्या बाहेर पडला. (Body Scan Machine) त्याच्यामते तो काही सेकंद अजून त्या मशीनमध्ये थांबला असता तर त्याचा गुदमरून मृत्यू झाला असता. या घटनेआधीही अशा प्रकारच्या काही घटना घडल्या होत्या. यात एमआरआय टेस्टदरम्यान रुग्णाचा जीव गेला होता.

सर्वातआधी हे समजू घेणं आवश्यक आहे की या मशीनच्या सहाय्याने रुग्णाला नक्की कोणता रोग झाला हे समजून घ्यायला मदत होते. याला तुम्ही एक्स-रेचे (X-Ray) पुढील व्हर्जनही म्हणू शकता. सीटी स्कॅनपेक्षाही हे तंत्रज्ञान अधिक समर्पक आणि कमी नुकसानदायक आहे. याला बॉडी स्कॅन असंही म्हटलं जातं. एमआरआय स्कॅन एका विशिष्ट अवयवापासून ते संपूर्ण शरीराचं स्कॅन करू शकतं. अशा या बहूउपयोगी तंत्रज्ञानाचे धोके काय आहेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहीजे ते जाणून घेऊ.

या टेस्टचे काही दुष्परिणाम आहेत का?

या टेस्टनंतर शरीरावर कोणताही दृष्परिणाम होत नाही. रेडिओलॉजीशी निगडीच एका वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, एमआरआयदरम्यान गरजेनुसार तुम्हाला त्या मशीनमध्ये कसे बसायचे आहे ते सांगितले जाते आणि त्याबद्दल पूर्ण सावधता बाळगली जाते. रुग्णाच्या अवस्थेवरून त्याला एमआरआय टेस्टदरम्यान कोणत्या गोळ्या द्यायच्या हे ठरवलं जातं. जर याबाबतीत कोणती चूक झाली तर रुग्णाच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतं.

या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष-

एमआरआय टेस्टच्यावेळी धातू, त्यातही लोहच्या कोणत्याही वस्तू स्वतःजवळ बाळगू नका. मशीनमधील तापमानामुळे त्या वस्तू वितळू शकतात, ज्याचा रुग्णाला फटका बसू शकतो. रेडिओग्राफर या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार मशीनमध्ये प्रवेश घ्या. या टेस्टआधी तुमच्या आरोग्याशी निगडीत सर्व माहिती तज्ज्ञ डॉक्टरांना द्या. तुम्ही दिलेल्या माहितीच्याआधारेच डॉक्टर तुमच्या टेस्ट करतील आणि तुम्हाला औषधं देतील. सर्वसामान्यपणे टेस्ट झाल्यानंतर लगेच किंवा काही काळासाठी अशक्त वाटतं आणि चक्कर आल्यासारखं वाटतं. मात्र टेस्टनंतर काहीवेळ आराम करा. थोड्या वेळानंतर योग्य आहार, आराम घेऊन ड्रायविंगसारखी कामं करा.

महिलांना Middle Finger बोट दाखवणं पडू शकतं महागात, येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

ही 10 कामं करून तुम्ही व्हाल कोट्यवधी, एकदा प्रयत्न कराच!

तुम्ही गेलेल्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा लपवलाय का? असं घ्या जाणून

ऑफिसमध्ये जाताना दिवसातून एकदा तरी तुमच्या मनात हे 10 प्रश्न येतातच

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 01:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading