महिलांना Middle Finger बोट दाखवणं पडू शकतं महागात, येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

महिलांना Middle Finger बोट दाखवणं पडू शकतं महागात, येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

दिराने तिच्याकडे पाहून विचित्र हावभाव करत मिडल फिंगर दाखवले होते. या प्रकारामुळे संतप्त महिलेने त्याला मारहाण देखील केली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: भारतात महिलांच्या सुरक्षितेतेसाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. महिलांकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यालयात अश्लील हावभाव करणे हा देखील गुन्हा मानला जातो. आता या नियमात आणखी एका गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे महिलांना जर 'मिडल फिंगर' दाखवले तर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते.

यासंदर्भात कोर्टाने नुकताच एक निर्णय दिला आहे. महिलांकडे पाहून अशा प्रकारे हावभाव करणे हे त्यांच्या सन्मानाविरुद्ध असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. पीडित महिलेने 21 मे 2014 रोजी दिराविरोधात तक्रार दाखल केली होती. दिराने तिच्याकडे पाहून विचित्र हावभाव करत मिडल फिंगर दाखवले होते. या प्रकारामुळे संतप्त महिलेने त्याला मारहाण देखील केली होती.

संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी 8 ऑक्टोबर 2015 रोजी आयपीसी कलम 509 आणि 323 नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने संबंधित व्यक्तीला 3 वर्षाची शिक्षा आणि दंड देखील केला.

आरोपीने स्वत:चा बचाव करताना असा दावा केला होता की, हा जमीनीचा वाद आहे आणि संबंधित महिलेने खोटा आरोप केला आहे. पण प्रत्यक्षात आरोपीने महिलेकडे पाहून मिडल फिंगर (मधले बोट) दाखवले होते आणि अश्लील शब्द वापरले होते. सुनावणी दरम्यान कोर्टाला जमीनीचा कोणताही वाद असल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे कोर्टाने त्याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

आतापर्यंत आहात सिंगल; तर ट्राय करा या टिप्स, आयुष्यात परत येईल प्रेम

ऑफिसमध्ये जाताना दिवसातून एकदा तरी तुमच्या मनात हे 10 प्रश्न येतातच

या उपायांनी झोपल्यावरही कमी करू शकता वजन, वापरा या सहज सोप्या टिप्स

VIDEO: 'बादशहाच्या दरबाराला लाथ मारणारा आमचा राजा होता'; पवारांचा उदयनराजेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 23, 2019 02:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading