मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भारतातील पहिलं Sanitary Napkin Free Village! सॅनिटरी पॅड न वापरणाऱ्या या गावाचं होतंय कौतुक कारण...

भारतातील पहिलं Sanitary Napkin Free Village! सॅनिटरी पॅड न वापरणाऱ्या या गावाचं होतंय कौतुक कारण...

Indias first sanitary napkin free village : एकिकडे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याला प्रोत्साहन दिलं जात असताना हे गाव मात्र सॅनिटरी पॅड फ्री झालं आहे, तरी या गावाचं देशभर कौतुक होतं आहे.

Indias first sanitary napkin free village : एकिकडे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याला प्रोत्साहन दिलं जात असताना हे गाव मात्र सॅनिटरी पॅड फ्री झालं आहे, तरी या गावाचं देशभर कौतुक होतं आहे.

Indias first sanitary napkin free village : एकिकडे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याला प्रोत्साहन दिलं जात असताना हे गाव मात्र सॅनिटरी पॅड फ्री झालं आहे, तरी या गावाचं देशभर कौतुक होतं आहे.

तिरुवनंतपुरम, 14 जानेवारी :  मासिक पाळीत महिलांच्या आरोग्याच्या प्रश्न लक्षात घेता गावागावात सॅनिटरी नॅपकिन्सचं  वाटप केलं जातं. असं असताना केरळमधील (Kerala) कुंबलांगी (kumbalangi)  गाव मात्र सॅनिटरी पॅड फ्री (Sanitary Napkin Free Village) झालं आहे. देशातील हे पहिलं असं गाव आहे. या गावात महिला आता सॅनिटरी नॅपकिन्स वापरतच नाहीत. सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यावर भर दिला जात असताना या गावात सॅनिटरी नॅपकिन्स वापरलं जात नाही म्हणून कौतुक केलं जात आहे. याचं कारणही खास आहे.

साक्षरतेसह अनेक बाबतीत देशात आघाडीवर असणाऱ्या केरळने आता एका अभिनव गोष्टीतही आघाडी घेतली आहे.

केरळमधल्या एर्नाकुलम (Ernakulam) जिल्ह्यातलं कुंबलांगी गाव हे देशातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिनमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. हिंदुस्थान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, या गावातल्या मुली आणि महिलांना मासिक पाळीसाठी वापरण्यात येणारे 5000हून अधिक सिलिकॉन कप (Silicon Cup) वाटण्यात आले असून, त्यांचा वापर, त्यांचे फायदे याविषयी तीन महिने प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 'अवलकाई' म्हणजेच तिच्यासाठी (For Her) या नावाने सुरू करण्यात आलेल्या एका विशेष योजनेअंतर्गत या गावात हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.

असा अभिनव उपक्रम राबवणारं कुंबलांगी हे गाव इतर गावांसाठीही आदर्श असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने असे उपक्रम महत्त्वाचे ठरतील, असं केरळचे राज्यपाल (Governor) आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटलं आहे. आपल्या देशातली खेडी प्रगत झाली तर देशही प्रगतिपथावर राहील, असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - VIDEO: पत्नीच्या शेवटच्या इच्छेसाठी रिटायर्ड डॉक्टरने दान केली 5 कोटींची संपत्ती

एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघात हा प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती खासदार हिबी एडन यांनी दिली. एचएलएल मॅनेजमेंट अकॅडमीनं थिंगल या योजनेद्वारे या उपक्रमाला सहकार्य केलं असून, इंडियन ऑइल कार्पोरेशनचंही (Indian Oil Corporation) यासाठी सहकार्य लाभलं असल्याची माहिती इंडिया टुडेनं दिली आहे.

हिबी एडन (HIbi Eden) यांनी हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटरी नॅपकिनमुळे (Sanitary Napkin) होणाऱ्या प्रदूषणाला या अभिनव उपक्रमामुळे आळा बसेल आणि काम करणाऱ्या महिला, विद्यार्थिनी यांच्या वैयक्तिक आरोग्याला, स्वच्छतेला प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमासाठी अभिनेत्री पार्वती यांच्यासह अनेक मान्यवरांनी पाठिंबा आणि सहकार्य केल्याचंही एडन यांनी सांगितलं. याआधी आम्ही शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेडिंग मशीन्स बसवली होती; मात्र त्यात नेहमी अडचणी येत होत्या. त्यामुळं मेन्स्ट्रुअल कप अर्थात मासिक पाळीसाठी सिलिकॉन कपची (Menstrual Cup) कल्पना पुढं आली तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केला. तज्ज्ञांकडून माहिती घेतली. या कपचा वापर अत्यंत सुरक्षित असतो. त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका पोहोचत नाही. तसंच एकदा घेतलेला कप दीर्घकाळ वापरता येतो असं तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर आम्ही त्याच्या पुरवठ्याबाबत पुढाकार घेतला, असंही एडन यांनी सांगितलं.

हे वाचा - ब्रेस्टकडे पाहून पाळीव कुत्रा वारंवार करत होता इशारा; सत्य समजताच हादरली महिला

याबाबत 'द लॅन्सेट पब्लिक हेल्थ जर्नल'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मेन्स्ट्रूअल कप वापरण्याचा प्रयोग करून पाहिलेल्या महिलांपैकी जवळपास 70 टक्के महिला पुढेही याचाच वापर सुरू ठेवण्याचा निर्णय घेत असल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरूनही या उपक्रमाच्या यशस्वितेची शक्यता दुणावली.

आजही आपल्या देशात असंख्य महिला आणि मुलींना मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन विकत घेणं परवडत नाही. त्यामुळे महिन्यातले मासिक पाळीचे (Menstrual cycle) चार-पाच दिवस घरीच राहावं लागतं. तसंच कपड्याच्या वापरामुळे योग्य स्वच्छता घेणंही शक्य होत नसल्यानं मूत्रमार्गाच्या संसर्गासारख्या आजारांनाही सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन, टॅम्पून्स यामुळे होणारं प्रदूषणही प्रचंड असून, त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होत आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिनऐवजी मेन्स्ट्रूअल कप अर्थात मासिक पाळीसाठी सिलिकॉन कप वापरणं हा पर्याय अत्यंत सुरक्षित, स्वस्त, पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहे.

कुंबळगी गावातल्या (Kumbalgi) या अभिनव उपक्रमामुळे देशातल्या इतर गावांमध्येही असा उपक्रम राबवण्यास प्रोत्साहन मिळेल आणि महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी हातभार लागेल आणि सॅनिटरी नॅपकिनमुळे (Sanitary Napkin) होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेल.

First published:

Tags: Free menstrual products, Kerala, Lifestyle, Period, Sanitary napkins, Sanitary pads