लंडन, 14 जानेवारी : कुत्रा (Dog) हा माणसांचा चांगला मित्र म्हटला जातो. त्यातही तो पाळलेला असेल तर मग आपल्या मालकासाठी काहीही करतो. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाच्या बऱ्याच स्टोरी तुम्हाला माहिती असतील. अशाच एका कुत्र्याची चर्चा सध्या होते आहे. त्याने आपल्या मालकीणीसोबत असं काही केलं की त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
यूकेच्या वेस्ट यॉर्कशायरमध्ये राहणारी 46 वर्षांची अन्ना नेरी (Anna Neary). तिने पाळलेला कुत्रा हार्वे (Pet Dog). तो विचित्र वागत होता. नेरीच्या ब्रेस्टकडे पाहत होता. त्या भागावर वास घेत होता आणि तिथं पंजा, डोकं मारून इशाराही करत होता.
मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार नेरीने सांगितलं, ती आपल्या घरात सोफ्यावर बसली होती. तेव्हा हार्वे तिच्याजवळ आला. तिच्या शरीराचा वास घेऊ लागला. त्यानंतर त्याने माझ्या ब्रेस्टवर दोन-तीन वेळा आपलं डोकं आपटलं. तिथं मारून इशारा करत तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. सुरुवातीला मला हे सामान्य वाटलं. पण सलग सहा आठवडे तो तसंच करत होता, त्यामुळे मलाही थोडी चिंता वाटली. त्याचं असं वागणं मी गांभीर्याने घेतलं.
हे वाचा - Deodorant चा वापर करत आहात ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी
अन्ना डॉक्टरांकडे गेली. तिने आपल्या काही वैद्यकीय तपासण्या गेल्या. चाचणीतून जे निदान झालं त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला ब्रेस्ट कॅन्सर होता. तिचा कॅन्सर तिसऱ्या टप्प्यात पोहोचला होता.
कॅन्सर... (Cancer) ज्याची लक्षणं सुरुवातीला दिसत नाही आणि जेव्हा दिसू लागतात आणि त्याचं निदान होतं तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात. पण एका कुत्र्याने मात्र फक्त वासाने कॅन्सरचं निदान केलं आहे आणि आपल्या मालकीणीला महाभयंकर आजारापासून वाचवलं आहे. महिलेनेच तसा दावा केला आहे.
हे वाचा - व्यायाम करताना 80 टक्के लोक ही चूक करतात; या घातक आजारांचा धोका वेळीच ओळखा
माझ्या आजाराचं वेळेत निदान केल्याने हार्वेचे माझ्यावर खूप उपकार आहेत. त्याचे हे उपकार मी आयुष्यभऱ विसरणार नाही, असं ती म्हणाली. नेरीने आपला हा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. महिलेची पोस्ट पाहताच नेटिझन्सनी हार्वेचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Cancer, Health, Lifestyle, Serious diseases