काढा, गरम पाण्याने कोरोनाचा काटा काढता काढता बळावले इतर आजार

काढा, गरम पाण्याने कोरोनाचा काटा काढता काढता बळावले इतर आजार

कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून जास्तीत जास्त काढा (kadha) आणि गरम पाण्याचं सेवन केलं जातं आहे. मात्र यामुळे घशाची वाट लागली आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) लस येईपर्यंत रोगप्रतिकारक शक्ती (immunity) वाढवण्यावर भर दिला जातो. यासाठी गरम पाणी (hot water) आणि काढा (kadha) पिण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र लोक जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त गरम पाणी आणि काढा पितात आणि याचा दुष्परिणाम जाणवू लागला आहे.

काढा गरजेपेक्षा जास्त उकळवणं आणि जास्त प्रमाणात पिणं या दोन्हीमुळे शरीरावर चांगल्याऐवजी वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे युरिन इन्फेक्शन, अॅक्ने, पित्त, उष्णता वाढणं, शरीराचा कोरडेपणा वाढणं आणि तोंड येण्यासारखे प्रकार होऊ शकतात.

अति गरम पाणी आणि काढा घेतल्यामुळे घशात दुखायला लागते, जळजळ होते, अन्न गिळायला त्रास होतो. घशातील अल्सरचं प्रमाणही वाढत आहे. कोरोना नसूनही घशावर अत्याचार केल्याने घसादुखीचा त्रास असणारे आमच्याकडे जवळपास 10 ते 15 टक्के रुग्ण येत असल्याचं कान, नाक आणि घसा तज्ज्ञ डॉ. अशेष भूमकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितलं.

हे वाचा - डोकेदुखीचं औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार? COVID-19 उपचारात देणार Aspirin

घशामध्ये खवखव होत असल्यास आम्ही कोमट पाण्याच्या गुळण्या करण्याचा सल्ला देतो. मात्र लोकांनी कोरोनाच्या भीतीनं कडक गरम पाण्याचे सतत सेवन केलं. त्यामुळे घशातील त्वचा जळाल्याचंही काही रुग्णांमध्ये आढळलं, असं कूपर रुग्णालयातील कान, नाक आणि घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशाळ लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

न्यूयॉर्कमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉ. निधी पंड्या यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना काढा नेमका किती आणि कसा प्यावा याबाबत मार्गदर्शन केलं आहे. डॉ. निधी म्हणाल्या, काढा जास्त उकळवू नका. दररोज किंवा एकावेळी भरपूर काढा पिऊ नका. दिवसभरात फक्त अर्धा कप काढा प्या. हिवाळ्यात तुम्ही दोन कपांपर्यंत काढा घेऊ शकता. तीन आठवडे रोज काढा घेतलात तर 2 आठवडे पिऊ नका. नंतर पुन्हा सुरू करा.

हे वाचा - नाकात वारंवार येतात फोड; कायमची मुक्ती मिळवण्यासाठी काय आणि कसा उपचार करावा?

काढ्यात थंड गुणधर्म असलेले मसाले टाक, काढ्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि फोड येतात. त्यामुळे दिवसभर शरीराला थंडावा देणारा संत्रांसारखा साधा आहार घ्या, पुदिनामिश्रित पाणी किंवा नारळाचं पाणी प्या. त्याने पोट थंड राहिल, असा सल्ला डॉ. निधी यांनी दिला.

Published by: Priya Lad
First published: November 7, 2020, 8:36 AM IST

ताज्या बातम्या