जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नाकात वारंवार येतात फोड; कायमची मुक्ती मिळवण्यासाठी काय आणि कसा उपचार करावा?

नाकात वारंवार येतात फोड; कायमची मुक्ती मिळवण्यासाठी काय आणि कसा उपचार करावा?

नाकात वारंवार येतात फोड; कायमची मुक्ती मिळवण्यासाठी काय आणि कसा उपचार करावा?

अनियंत्रित हार्मोन्स, संक्रमण याशिवाय तुमच्या काही सवयीदेखील नाकात फोड येण्यास कारणीभूत आहेत.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    मुरुम किंवा पुटकुळी शरीरावर कुठेही येऊ शकतात आणि नाक देखील त्याला अपवाद नाही. नाकाच्या आत मुरुम केवळ त्रासदायकच नाही तर वेदनादायक देखील आहे. मुरुमांचे सामान्य कारण म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये तेलकट किंवा मृत त्वचेचा साठा. नाकात मुरुम अनेक कारणांमुळे उद्भवू शकतात. काही प्रकरणांमध्ये संक्रमणाचं परिणाम असू शकते. तर काही वेळा तुमच्या सवयी याला कारणीभूत ठरतात. myupchar.com शी संबंधित डॉ. ओमर अफरोज यांनी सांगितलं की, जे लोक स्वच्छतेची काळजी घेत नाहीत त्यांना नाकात मुरुम होण्याची शक्यता जास्त असते. नाकात बोटं घालणं, नाकात अस्वच्छ आणि वाढलेली नखं घालणं, नाकचे केस ओढणं किंवा नाकांचे केस काढण्यासाठी धारदार कात्री वापरणं यामुळे मुरुम होण्याची शक्यता उद्भवते. तसंच अॅलर्जी, जीवाणूंचं संक्रमण, संप्रेरक असंतुलन, रासायनिक संपर्क, अस्वस्थ आहार किंवा लहान रक्तवाहिन्यांची सूज यामुळेदेखील नाकात मुरुम होऊ शकतात. जर आधीपासूनच त्वचेची समस्या असेल आणि मुरुमांची तक्रार असेल तर मुरुम होण्याचा धोका जास्त असतो. नाकात मुरुम झाल्याची लक्षणं नाकाला स्पर्श केल्यानंतर वेदना होणं, नाकाला सूज येणं, नाकाची त्वचा लालसर होणं, नाकाला खाज सुटणं आणि जळजळ  होणं ही नाकात मुरुम झाल्याची लक्षणं आहेत. जेव्हा नाकात मुरुम येतात तेव्हा नाक बंद झाल्यासारखं वाटतं. तसंच वास घेण्याच्या क्षमतेवरदेखील परिणाम होतो. डोकेदुखी, थकवा किंवा तीव्र तापाची लक्षणंदेखील काही बाबतीत संक्रमित मुरुमांमुळे जाणवतात. अशावेळी डॉक्टरकडे जा जर चक्कर येणं, नीट न दिसणं, डोळ्यातील बाहुलीचे वेगवेगळे आकार, डोळे लालसर होणं, सूज येणं आणि वेदनादायक पुरळ असल्यास डॉक्टरांकडे जा. डॉक्टर अनुनासिक मुरुमाची तपासणी करतील. चाचणीसाठी रक्ताचे आणि मुरुमांच्या द्रवपदार्थाचे नमुने घेऊ शकतात. त्यात जीवाणू आढळल्यास त्यानुसार योग्य प्रतिजैविक औषधं दिली जातात. गंभीर परिस्थितीत डोक्याचा एमआरआय आणि सीटी स्कॅन केला जाऊ शकतो. ज्यात सायनस ग्रंथीचा संसर्ग आहे का हे तपासलं जातं. जीवनशैलीमध्ये बदल करा मुरुमांचा त्रास असल्यास आपल्या जीवनशैलीत काही बदल आवश्यक आहेत. खाण्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. रोज फळ आणि भाज्यांचं सेवन करावं. याशिवाय सुका मेवा खा कारण यामुळे खनिजं मिळतात जे त्वचा निरोगी बनण्यास मदत करतात. मध, केळी आणि कांदे खा जेणेकरून प्रोबियटिक्सची पातळी वाढू शकते कारण मुरुमांना बरे करण्यास प्रोबायोटिक्स खूप महत्त्वाचे आहेत. जीवनसत्त्व डी घ्याययला विसरू नका, काही वेळ कोवळ्या उन्हातही बसा. प्रतिबंधात्मक उपाय आपल्या नाकात मुरुम होतील अशा कारणांपासून दूर रहाणे चांगले. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. नाकात बोट, नखं, टिश्यू किंवा कॉटन घालू नका. कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन करू नका यानं मुरुम होण्याचा धोका वाढतो. जास्त पाणी प्या. जेणेकरून विष शरीरातून बाहेर पडेल. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख -  नाकामधील मुरुम : लक्षणे, कारणे… न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात