डोकेदुखीचं औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार? COVID-19 उपचारात दिलं जाणार Aspirin

डोकेदुखीचं औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार? COVID-19 उपचारात दिलं जाणार Aspirin

सर्वत्र उपलब्ध असलेलं स्वस्त असं Aspirin औषध कोरोना रुग्णांसाठी प्रभावी आणि सुरक्षित आहे, असा दावा संशोधकांनी केला आहे.

  • Share this:

लंडन, 06 नोव्हेंबर : डोकं दुखू लागलं, अंग दुखू लागलं की आपल्यापैकी बरेच जण Aspirin घेतात. पेनकिलर म्हणून अॅस्पिरीनचा वापर केला जातो. मात्र आता हेच औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरण्याची शक्यता आहे. हे औषध सुरक्षित असून कोरोनावर प्रभावी ठरू शकतं, असं संशोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे लवकरच COVID-19 उपचारात Aspirin दिलं जाणार आहे.

कोरोना रुग्णांवर (corona patient) सध्या वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल सुरू आहे. यापैकी काही औषधं प्रभावी असल्याचं दिसतं आहे. दरम्यान आता सर्वसामान्यपणे वापरलं जाणारं Aspirin हे औषधही कोरोना रुग्णांना दिलं जाणार आहे. यूकेमध्ये (UK) या औषधाचं कोरोना रुग्णांवर व्यापक स्तरावर ट्रायल होणार आहे.

हृदयाच्या समस्या असल्यास अॅस्पिरीन हे औषध दिलं जातं. हे औषध रक्त पातळ करतं त्यामुळे ब्लड क्लॉट (Blood clot) म्हणजे रक्ताच्या गुठळ्या झाल्यास हे औषध डॉक्टर देतात.  कोरोना रुग्णांमध्ये हायपर रिअॅक्टिव्ह प्लेटलेट्सची समस्या उद्भवते. त्यामुळे त्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असतो. अॅस्पिरिनमध्ये अँटिप्लेटलेट घटक असतो जो रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या उपचारात अॅस्पिरीन औषधाचा समावेश केला जाणार आहे.

हे वाचा - ताप, खोकलाच नव्हे तर मानसिक गोंधळ उडणं हेही आहे कोरोनाचं प्राथमिक लक्षण

रॉयटर्सच्या वृत्तानुसार यूकेमध्ये या औषधाचं कोरोना रुग्णांवर ट्रायल घेतलं जाणार आहे. कमीत कमी 2,000 कोरोना रुग्णांना तरी हे औषध दिलं जाणार आहे. इतर औषधांसह या औषधाचा दररोज 150 mg डोस दिला जाणार आहे. यानंतर या रुग्णांची इतर रुग्णांशी तुलना केली जाणार आहे.

संशोधनाचे अभ्यास पीटर होर्बे म्हणाले, "अॅस्पिरीन हे फायदेशीर आणि सुरक्षित आहे. शिवाय हे औषध स्वस्त आणि सर्वत्र उपलब्ध आहे"

त्यामुळे जर हे ट्रायल यशस्वी झालं, तर हे औषध कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरेल. कारण कोरोना रुग्णांना होणारा धोका टाळता येईल.

हे वाचा - Good News: आपल्या मुंबईने करून दाखवलं, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 200 दिवसांवर

सध्या विविध औषधांचं ट्रायल सुरू आहे. यामध्ये स्टेरॉइड्स, रेमिडेसिवीर आणि हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषधांचा समावेश आहे. कोरोना रुग्णाला झालेलं संक्रमण नेमकं कसं आहे, म्हणजे ते सौम्य, मध्यम की गंभीर स्वरूपाचं आहे. यावर त्याची उपचार पद्धत आणि त्याला कोणती औषधं द्यायचं हे अवलंबून आहे.

1) रुग्णालयात दाखल असलेले किंवा रुग्णालयात दाखल नसलेले आणि अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता नसलेले रुग्णांना स्टेरॉइड्स दिलं जातं.

2) रुग्णालयात दाखल असलेले ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे मात्र श्वासोच्छवासाचं मशीन उपलब्ध नाही अशा रुग्णांना अँटिव्हायरल ड्रग रेमिडेसिवीर दिलं जातं. तसंच काही प्रकरणांमध्ये स्टेरॉइड सुद्धा दिलं जातं.

3) रुग्णालयात दाखल असलेल्या आणि श्वासोच्छवासाच्या मशीनवर अवलंबून असलेल्या रुग्णांना रेमिडेसिवीर आणि स्टेरॉइड दिलं जातं.

4) तसंच हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि इतर औषधं या बाबतीत सल्ला देणं पुरेसं आहे कारण ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हे अधिकाधिक कोरोना व्हायरसच्या अभ्यासातून आढळून आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: November 6, 2020, 6:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading