सावधान ! कोल्डड्रिंक पिण्याची सवय जीवावर बेतू शकते; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

सावधान ! कोल्डड्रिंक पिण्याची सवय जीवावर बेतू शकते; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

कृत्रिमरित्या गोड केलेली पेय पिण्याची सवय असेल तर तात्काळ ती बंद करा. अशी पेय प्यायल्याने तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर: कोल्डड्रिंग पिण्याची आवड आपल्यापैकी अनेकांना असते. पण जर तुम्ही वारंवार कोल्डड्रिंक पित असाल तर त्याचा धोका थेट तुमच्या हृदयाला आहे. नव्या अभ्यासानुसार कृत्रिम पद्धतीने तयार केलेली गोड पेयं प्यायल्यामुळे हृदयाला अपाय होऊ शकतो. सॉरबॉन पॅरिस नॉर्ड विद्यापीठातील न्युट्रिशनल एपिडेमिऑलॉजीच्या संशोधन टीमने याबाबत एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. नव्या संशोधनातून कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या पेयांवर अधिक कर आणि निर्बंध लावण्यासंबंधी सुरू असलेल्या चर्चेला अधिक बळच मिळणार आहे.

या आधीच्या अभ्यासांतूनही हे सत्य समोर आलं होतं. या कृत्रिम पेयाचा स्टँडर्ड वजनाचा ग्लास किंवा बाटली किंवा कॅन गृहित धरून असे दिवसाला 2 कॅन पिणाऱ्या महिलेचा वेळेआधी मृत्यू होण्याची शक्यता 63% वाढली होती. तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण 29% होतं. 2019 च्या अभ्यासातून स्पष्ट झालं होतं. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिऑलॉजीच्या जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या नव्या संशोधनात 1 लाख फ्रेंच स्वयंसेवकांकडून गोळा केलेल्या डेटाचं विश्लेषण करण्यात आलं आहे.

या स्वयंसेवकांचं साखरेची पेय न पिणारे, कमी प्रमाणात पिणारे आणि भरपूर पिणारे अशा 3 गटांत वर्गीकरण करण्यात आलं होतं. जे अशी कृत्रिम साखर असणारी पेयं अजिबातच पित नाहीत त्यांची, आणि भरपूर प्रमाणात ही पेय पिणाऱ्यांची तुलना केली तर भरपूर पेयं पिणाऱ्यांना कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी अधिक असल्याचं आढळून आलं. कमी प्रमाणात कृत्रिम गोड पेयं पिणारे आणि अधिक प्रमाणात पिणारे यांच्या तुलनेतही समान निष्कर्ष समोर आलं. त्यामुळे कृत्रिम पेय पिणं आणि हृदयविकार यामध्ये संबंध आहे हेच या संशोधनातून सिद्ध होत असून ही पेय पिल्यामुळेच हृदयविकार होऊ शकतो, असं यातून सिद्ध होत नाही असंही संशोधकांनी स्पष्ट केलंय.

अशा पेयांचं व्यसन असेल तर काय करायचं?

तज्ज्ञ सांगतात, प्यायचं पाणी कार्बोनेटेड असेल तरीही चांगला पर्याय आहे. त्या पाण्यात फळांचे रस करुन प्या. ऋतुनुसार जी फळं उपलब्ध असतील त्यांचे रस करुन प्यायले तर त्यामुळे कोणताही अपाय होणार नाही उलट फायदाच होईल. काही दिवस साखरेविना राहण्याचं आव्हान स्वीकारा. आपल्या चवीच्या ग्रंथी दर 2 आठवड्यांनी बदलतात. त्यामुळे आपण थोड्या काळासाठी कमी गोड खाऊन रहायची सवय लाऊ शकतो. गोड खायची पहिली इच्छा गेली की तुमच्या जिभेला नैसर्गिक साखर अधिक सवयीची होईल, असंही तज्ज्ञ सांगतात.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 28, 2020, 9:29 PM IST

ताज्या बातम्या