लघवी करताना जळजळ, वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम

लघवी करताना जळजळ, वेदना; घरगुती उपचारांनी मिळवा आराम

काही विशिष्ट पदार्थांचं विशिष्ट पद्धतीने सेवन केल्याने लघवीशी संबंधित या समस्येपासून (Urine problem) मुक्ती मिळू शकते.

  • Last Updated: Oct 23, 2020 11:55 PM IST
  • Share this:

लघवी (urine) करताना जळजळ आणि वेदना होण्याच्या समस्येस डिस्युरिया असं म्हणतात. myupchar.com शी संबंधित एम्सच्या डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं, डिसयुरियामध्ये लघवी करताना मूत्राशयातून जाणाऱ्या नलिकांच्या (जननेंद्रिया संबंधीत) भोवती वेदना होणं किंवा जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

ही समस्या 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना होते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त पाहायला मिळतं. याचं कारण संक्रमण आहे, जे कोणत्याही बाह्य जंतू किंवा जीवाणूंच्या संपर्कातून उद्भवतं. यामुळे ताप येऊ शकतो.

या समस्येवर घरच्या घरीही उपचार करता येऊ शकतात. हे उपचार काय आहेत पाहुयात.

लिंबू

लिंबामध्ये अ‍ॅसिड असतं जे जीवाणू आणि विषाणूंपासून बचाव करतं. लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात टाका. त्यात मध मिसळा आणि दररोज रिकाम्या पोटी प्या.

काकडी

डिसयुरियामध्ये काकडी एक प्रभावी औषध मानलं जातं. जेव्हा शरीर हायड्रेटेड राहतं तेव्हा शरीरातील सर्व विषारी द्रव्य लघवीवाटे शरीराबाहेर जातात, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा धोका राहत नाही. काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवण्याचे कार्य करते कारण त्यात 95% पाणी असतं. काकडीचा रस बनवून त्यात एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोनदा प्यायल्याने डिसयुरिया बरा होतो.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे डिस्युरियामध्ये प्रभावी औषध म्हणून काम करतात. मेथीचे दाणे योनीमार्गाची सामान्य पीएच पातळी राखतंसंक्रमणापासून संरक्षण करतं, तसंच शरीरातील विषारी द्रव बाहेर टाकण्याचं कार्य करतं. एक ग्लास ताकात अर्धा चमचा मेथी दाण्यांची पावडर मिसळून दररोज दोनदा सेवन करा.

दही

दह्यामध्ये असे जीवाणू आहेत जे शरीरातले हानिकारक जीवाणू काढून टाकण्यासाठी कार्य करतं. दही खाल्ल्यानं लघवीमधील पीएच पातळी सामान्य राहण्यास मदत होते. दररोज तीन कप दही खाल्ल्यास लघवीच्या संसर्गामध्ये बराच फायदा होतो.

अॅपल सिडेर व्हिनेगर

या व्हिनेगरमध्ये अँटी-फंगल आणि जीवाणू विरोधक गुणधर्म आहेत, जे बर्‍याच संक्रमणास प्रतिबंधित करतात. त्यात पोटॅशियम आणि बरीच खनिजं असतात, जे शरीराची सामान्य पीएच पातळी राखण्यासाठी कार्य करतात. एक ग्लास पाणी गरम करा त्यात एक चमचा व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळा. हे पाणी दिवसातून दोनदा प्या. या मुळे डिस्युरियाची समस्या दूर होईल.

भरपूर पाणी प्या

myupchar.com शी संबंधित डॉ लक्ष्मीदत्त शुक्ल यांनी सांगितलं, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी सर्वात जास्त पाण्याची गरज असते. वास्तविक पाणी प्रत्येक समस्येवर उपचार करतं. भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं. लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी भरपूर पाणी प्यावं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - लिंगावर सूज

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: October 23, 2020, 11:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading