Home /News /lifestyle /

Alert! सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदनांना साधं Joint pain समजू नका; असू शकतं Blood cancer चं लक्षण

Alert! सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदनांना साधं Joint pain समजू नका; असू शकतं Blood cancer चं लक्षण

हिवाळ्यात सांध्यांमध्ये वेदना होणं ही समस्या सामान्य आहे. पण हेच ब्लड कॅन्सरचंही लक्षण असू शकतं.

मुंबई, 01 जानेवारी : कॅन्सर अर्थात कर्करोग (Cancer) हा अतिशय गंभीर, जीवघेणा आजार. हजारो व्यक्ती दर वर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. कॅन्सरसारखा आजार कधी, कुणाला होईल सांगू शकत नाही. कॅन्सरचं निदान लवकर झालं नाही, तर त्यावर नियंत्रण मिळवणं कठीण जातं. कर्करोग झाल्यानंतर अनेक लक्षणं दिसून येतात; पण ती गांभीर्याने घेतली जात नाहीत आणि दुर्लक्ष केलं जातं.  त्यात ब्लड कॅन्सर हा सर्वांत सामान्य कर्करोग आहे. रक्ताचा कॅन्सर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होतो. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि हा कर्करोग वेगाने शरीरात पसरू लागतो. त्यामुळे योग्य वेळी लक्षणं (symptom of blood cancer) लक्षात घेतली तर या आजाराच्या गंभीर परिणामांपासून बचाव करणं शक्य होतं. ब्लड कॅन्सर आणि इतर कॅन्सरमध्ये खूप फरक आहे. ब्लड कॅन्सरचे तीन प्रकार आहेत. यामध्ये ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा यांचा समावेश आहे. ब्लड कॅन्सर लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकतो. सहसा हा आजार वयाच्या 30 वर्षांनंतर होण्याची शक्यता असते. सर्वांत वेगाने पसरणारा आणि घातक असणारा कर्करोगाचा प्रकार म्हणजे ब्लड कॅन्सर. हे वाचा - Healthy Breakfast: ब्रेकफास्टमध्ये काय खावं, ओट्स की कॉर्नफ्लेक्स?; जाणून घ्या ब्लड कॅन्सरचे (Type of blood cancer) अनेक प्रकार आहेत. ब्लड कॅन्सर होताच कर्करोगाच्या पेशी शरीरात रक्त बनवण्यात अडथळा आणतात. त्यामुळे शरीराला रक्ताची कमतरता भासते. ब्लड कॅन्सरचे उपचार नेहमीच त्याच्या प्रकारावर अवलंबून असतात. कॅन्सरच्या उपचारांत केमोथेरपी, टार्गेट थेरपी, रेडिएशन थेरपी, बायोलॉजिकल थेरपी आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट थेरपी दिली जाते. ब्लड कॅन्सर असेल तर तो साध्या ब्लड टेस्टनेदेखील ओळखता येतो. तसंच जनरल ब्लड पिक्चरद्वारेदेखील त्याची तपासणी केली जाते. या पद्धतीद्वारे कॅन्सर असल्याचं कळल्यानंतर तो बरा होण्याची शक्यता किती आहे, याचा अंदाज व्यक्त केला जातो. हे वाचा - लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला रुग्णाचं तोंड, घसा, त्वचा आणि फुफ्फुसात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. याशिवाय हाडं, स्नायू दुखणं हेदेखील ब्लड कॅन्सरचं प्रारंभिक लक्षण आहे. सांधेदुखी, तोंडातून, नाकातून किंवा शौचावाटे रक्त येणं, ताप येणं, रात्री घाम येणं आणि चक्कर येणं, वारंवार संसर्ग होणं आणि वजन कमी होणं, ही लक्षणं हृदयविकाराची नव्हेत, तर ब्लड कॅन्सरची आहेत. ही लक्षणं दिसल्यास आवर्जून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
First published:

Tags: Cancer, Health, Lifestyle, Pain

पुढील बातम्या