मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम

लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम

Lemon Water Side effects : अतिरिक्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया लिंबूपाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीराला काय नुकसान (Side Effects Of  Lemon Water) होऊ शकतं.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचं (Lemon Water) सेवन करत असाल तर त्याचे अनेक फायदे आहेत. पण वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही दिवसभर लिंबूपाणी पिण्यास सुरुवात केली असेल तर त्याचा फायदा होण्याऐवजी दुष्परिणामही होऊ शकतात. अतिरिक्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

जाणून घेऊया लिंबूपाणी जास्त प्रमाणात सेवन केल्यास आपल्या शरीराला काय नुकसान (Side Effects Of  Lemon Water) होऊ शकतं.

दातांचं होऊ शकतं नुकसान

लिंबाचा रस गरम पाण्यात मिसळून पिणं हानीकारक नाही. परंतु, जर ते जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते दातांना नुकसान (Teeth Problem) पोहोचवू शकतं. लिंबू तीव्र आम्लयुक्त असते. त्याचा वारंवार वापर केल्यानं तुमच्या दातांवर इनॅमलचं आवरण नष्ट होऊ शकतं. त्यामुळं खूप जास्त लिंबूपाणी पिऊ नका.

शरीरातील पाण्याची पातळी होऊ शकते कमी

संशोधनानुसार, लिंबाच्या रसामध्ये एस्कॉर्बिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असतं. ज्यामुळं वारंवार लघवीला जावं लागतं. यामुळं मूत्रपिंडात मूत्र तयार होण्यास वेग येतो, ज्यामुळे शरीरातील मीठ आणि पाणी कमी होतं. असं झाल्यास शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन विविध समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा - EPFO Updates: कुटुंबासाठी पूर्ण करा हे काम, वाचा EPFO मध्ये नॉमिनीचे काय आहेत फायदे

पोटाचं नुकसान

लिंबाचं जास्त सेवन केल्यास पोटदुखी होऊ शकते. जरी अभ्यासातून हे सिद्ध झालेलं नसलं तरी या बाबीचा आयुर्वेदात विचार करण्यात आला आहे. जास्त प्रमाणात लिंबाचं सेवन केल्यास लिंबाच्या आम्लीय गुणधर्मामुळं पोटाशी संबंधित गुंतागुंत होऊन फायद्याऐवजी नुकसान होतं.

छातीत जळजळ समस्या

लिंबाच्या अतिरिक्त सेवनामुळं छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. छातीत जळजळ होण्याची सामान्य लक्षणं म्हणजे छातीत वेदना आणि तीव्र जळजळ.

हे वाचा - Bathroom Stroke: हिवाळ्यात अंघोळ करताना होणारी ही चूक ठरू शकते जीवघेणी; बाथरूम स्ट्रोकबद्दल माहीत आहे का?

अल्सर होऊ शकतो

लिंबासारख्या आम्लयुक्त पदार्थाच्या अतिसेवनामुळं आतड्यांसंबंधी अल्सर होऊ शकतो. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये छातीत जळजळ, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Lifestyle