मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Healthy Breakfast: ब्रेकफास्टमध्ये काय खावं, ओट्स की कॉर्नफ्लेक्स?; दोघांमध्ये काय आहे सुपर हेल्दी, जाणून घ्या

Healthy Breakfast: ब्रेकफास्टमध्ये काय खावं, ओट्स की कॉर्नफ्लेक्स?; दोघांमध्ये काय आहे सुपर हेल्दी, जाणून घ्या

नाश्ता हा हेल्दी असणे गरजेच असते. ओट्स (Oats) आणि कॉर्नफ्लेक्स (cornflakes) या दोन पदार्थांचाही आता नाश्त्यामध्ये अनेकांकडून समावेश केला जातो.

नाश्ता हा हेल्दी असणे गरजेच असते. ओट्स (Oats) आणि कॉर्नफ्लेक्स (cornflakes) या दोन पदार्थांचाही आता नाश्त्यामध्ये अनेकांकडून समावेश केला जातो.

नाश्ता हा हेल्दी असणे गरजेच असते. ओट्स (Oats) आणि कॉर्नफ्लेक्स (cornflakes) या दोन पदार्थांचाही आता नाश्त्यामध्ये अनेकांकडून समावेश केला जातो.

नवी दिल्ली, 31 डिसेंबर:  दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी नाश्ता (Breakfast) सकस असणं खूप महत्वाचं (very important) आहे. योग्य पोषक घटक आणि जीवनसत्त्वे (nutrients and vitamins) असलेल्या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश केल्यास आपली प्रतिकारशक्ती (immunity) सुधारते. दिवसभर काम करण्याची ऊर्जा नाश्त्यातून मिळत असते. त्यासाठी नाश्ता हा हेल्दी असणे गरजेच असते. ओट्स (Oats) आणि कॉर्नफ्लेक्स (cornflakes) या दोन पदार्थांचाही आता नाश्त्यामध्ये अनेकांकडून समावेश केला जातो. टीव्ही 9 हिंदी ने याबाबत वृत्त दिलं.

तंदुरुस्त राहण्यासाठी नाश्ता नेहमी भरपूर प्रमाणात आणि आरोग्यदायी असावा. नाश्ता करणे कधीही टाळू नये. कारण त्यामुळे वजन वाढते. आता हेल्दी नाश्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ओट्स आणि कॉर्नफ्लेक्सने देखील नाश्त्यात आपले स्थान निर्माण केले आहे. स्वतःला तंदुरुस्त ठेवायला ज्यांना आवडते, ते नाश्त्यात हे दोन पदार्थ आवडीने खातात. विशेष म्हणजे हे पदार्थ बनवायला खूप कमी वेळ लागतो, सकाळी कामाला जाण्याच्या धावपळीत तुम्हाला हेल्दी आणि वेळेची बचत करणारे हे दोन पदार्थ खाण्यास आवडत असतील, तर आज आम्ही तुम्हाला ओट्स आणि कॉर्नफ्लेक्समध्ये कोणता पदार्थ खाणे आरोग्याच्यादृष्टीने जास्त फायदेशीर आहे, ते सांगत आहोत.

हेही वाचा-  Fenugreek leaves : मेथीची पाने इतक्या सगळ्या आजारांवर आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

 कॉर्नफ्लेक्समध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते. दुधात कॉर्नफ्लेक्स खाल्ल्यास शरीराला भरपूर प्रथिने मिळतात. वजन कमी करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम नाश्ता आहे. कमी कॅलरी असल्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा नाश्ता करणे फायदेशीर ठरते. तर, नाश्त्यात ओट्स खाल्ले तर जास्त वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी याची मदत होते. ओट्समध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे चयापचय क्रियेची गती वाढते. लो ग्लायसेमिक इंडेक्स फूडमध्ये याचा समावेश होतो. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असल्याने ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.

तुम्ही वजन कमी करत असाल, तर कॉर्नफ्लेक्स खाणं तुम्हाला अधिक फायद्याचं ठरू शकतं. कारण त्यामध्ये कॅलरीचं प्रमाण खूपच कमी आहे, पण तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर आहारात ओट्सचा समावेश करू शकता. ओट्समध्ये थोडा गूळ घालून खाल्ल्यास ते चविष्ट लागतं. मसाला ओट्स, ओट्स चिल्ला, ओट्स स्मूदी स्टाइल असे विविध पदार्थ तयार करूनही तुम्ही ओट्सचा नाश्त्यामध्ये समावेश करू शकता. तसेच, कॉर्नफ्लेक्स व ओट्स यामध्ये असणाऱ्या कॅलरींच्या प्रमाणात मोठा फरक आहे. 100 ग्रॅम कॉर्नफ्लेक्समध्ये 0.4 ग्रॅम फॅट, 84 ग्रॅम कार्ब, 7.5 ग्रॅम प्रोटीन, 1.2 ग्रॅम फायबर, 2 टक्के कॅल्शियम आणि एकूण 378 कॅलरीज असतात. तर 100 ग्रॅम ओट्समध्ये 10.8 ग्रॅम फॅट, 26.4 ग्रॅम प्रथिने, 16.5 ग्रॅम फायबर, 103 ग्रॅम कार्ब, 8 टक्के कॅल्शियम आणि एकूण 607 कॅलरीज असतात.

हेही वाचा-  लवकर वजन कमी व्हावं म्हणून भरपूर लिंबूपाणी पिताय; फायद्याऐवजी होईल दुष्परिणाम

 या दोन्हीपैकी कोणत्याही पदार्थाचा नाश्त्यामध्ये तुम्ही समावेश करू शकता. स्वतःचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी दररोज नाश्ता करण्याची सवय चांगली आहे. परंतु हा नाश्ता हेल्दी असावा, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Health, Health Tips