नवी दिल्ली, 24 जून : टायपिंग (Typing) म्हटलं की आपण ती हातानेच करतो. टाइपिंगमध्ये कोणती स्पर्धा असेल तर ती म्हणजे कोण किती वेगाने टाइपिंग करतो. अनेकांची बोटं की-बोर्डवर इतक्या वेगाने चालतात की आपण पाहूनच हैराण होतो. पण कधी कुणाला नाकाने (Typing with nose) किंवा तोंडाने (Typing with Mouth) टाइप करताना (Typing record) पाहिलं आहे का? भारतातल्याच एका व्यक्तीने ही कमाल केली आहे. त्याच्या या अनोख्या टॅलेंटची गिनीज बुकमध्येही (Guinness World Records) नोंद झाली आहे. जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतील (JNU) विनोद कुमार चौधरी (Vinod Kumar Chaudhary). स्कूल ऑफ इनव्हारयमेंटल सायन्सेसमध्ये ते कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. त्यांच्या नावावर 9 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. त्यापैकी 8 टायपिंगचे आहेत.
Delhi: Vinod Kumar Chaudhary, a computer operator at JNU, has 9 Guinness World Records to his credit
— ANI (@ANI) June 23, 2021
"I hold 8 records in typing, including for fastest typing with nose, fastest typing blindfolded & fastest typing with a mouth stick. I keep breaking my own records," he says. pic.twitter.com/gohuNh9Cqe
विनोद नाकाने आणि तोंडात स्टिक धरून तसंच डोळ्यांवर पट्टी बांधूनही टाइप करतात. 2014 साली त्यांनी आपल्या पहिला रेकॉर्ड नोंदवला होता. हे वाचा - लेक म्हणे, ‘अरेंज नको लव्ह मॅरेज हवं’; आईच्या जबरदस्त उत्तराने मुलीची बोलती बंद चौधरी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं, नाक, डोळ्यांवर पट्टी बांधून आणि तोंडात काठी धरून टाइप करण्याचा माझा रेकॉर्ड आहे. एका व्यक्तीला मी नाकाने टाइप करताना पाहिलं, त्यातून मला प्रेरणा मिळाली. मीसुद्धा असं करू शकतं, असा विश्वास मला होता. मग मी सराव सुरू केला आणि 2014 साली नाकाने टाइप करून मी माझा पहिला रेकॉर्ड केला होता. हे वाचा - 4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ऑनलाईन फूड; बिल बघून पालकांना बसला शॉक त्यानंतर डोळ्यांवर पट्टी बांधून, एका हाताने, एका बोटाने आणि माऊथ स्टिकने टाइप करण्याचे इतर रेकॉर्ड आहेत. आतापर्यंत कुणी माझा रेकॉर्ड तोडला नाही. मी स्वत:च माझा रेकॉर्ड मोडतो. त्यात आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, असं चौधरी यांनी सांगितलं.