मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सणासुदीला घरा-घरात खाल्ली जाणारी जिलेबी भारतीय पदार्थ नव्हे; अशी आहे तिची कहाणी

सणासुदीला घरा-घरात खाल्ली जाणारी जिलेबी भारतीय पदार्थ नव्हे; अशी आहे तिची कहाणी

जिलेबीचा इतिहास

जिलेबीचा इतिहास

जलेबी हा मूळचा अरबी शब्द आहे, असे म्हणतात. या पदार्थाचे खरे नाव जलबिया आहे. पण भारतात याला जिलेबी म्हणतात. गोड रसाने भरलेले असल्याने हे नाव पडले आणि नंतर त्याचे रूप जलेबी झाले. वायव्य भारत आणि पाकिस्तानमध्ये याला जलेबी म्हणतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 25 मार्च : जिलेबी (Jalebi) पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि मनाला ती खाण्याचा मोह आवरता येत नाही. पावसाळा असो किंवा उन्हाळा गरमागरम जिलेबी खाण्याची एक वेगळीच मजा असते. बर्‍याचदा जिलेबी विशेषतः सणासुदीला घरांमध्ये खाल्ली जाते. जिलेबीची चव प्रत्येक भारतीयाच्या जिभेवर आहे, जिलेबी इतर देशांमध्येही आवडीने खाल्ली जाते.

जिलेबी ही दूध, रबडी आणि दह़्यासोबतही खाल्ली जाते. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की, जिलेबीचा उगम कुठे झाला आणि तिचा इतिहास काय आहे. जिलेबीबद्दल सर्व माहिती जाणून घेऊयात, याबाबत 'टीव्ही 9'ने वृत्त प्रकाशित केलं आहे.

जिलेबीचा उगम कोठे झाला?

जलेबी हा मूळचा अरबी शब्द आहे, असे म्हणतात. या पदार्थाचे खरे नाव जलबिया आहे. पण भारतात याला जिलेबी म्हणतात. गोड रसाने भरलेले असल्याने हे नाव पडले आणि नंतर त्याचे रूप जलेबी झाले. वायव्य भारत आणि पाकिस्तानमध्ये याला जलेबी म्हणतात, महाराष्ट्रात काही ठिकाणी जिलबी आणि बंगालमध्ये जिलपी असा उच्चार केला जातो.

प्राचीन पुस्तकांमध्ये उल्लेख

प्राचीन काळात जिलेबी पाककृतीचा उल्लेख होता, 13 व्या शतकात मुहम्मद बिन हसन अल-बगदादीने या गोड पदार्थावर एक पुस्तक लिहिले होते. असे म्हणतात की, त्याचे नाव अल-ताबीख होते. या पुस्तकात झौलबिया म्हणजेच जिलेबीचा उल्लेख करण्यात आला आहे. इतकेच नाही तर जेव्हा पर्शियन आणि तुर्की व्यापारी भारतात आले, तेव्हापासून ही जिलेबी आपल्या देशातही बनवली जाऊ लागली.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

जिलेबी ही भारताची शान

जिलेबी आपल्या लज्जतदार चवीमुळे सर्वांनाच आवडते, जिलेबी घरीही सहज बनवता येते.जिलेबीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. हिवाळ्यात जिलेबी विशेष आवडीने खाल्ली जाते. थंड जिलेबी खायला मजा येत नाही. जिलेबी बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे मैदा, तूप, साखर. तुम्ही अर्ध्या तासात घरी सहज बनवू शकता.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

जिलेबीचे अनेक प्रकार आहेत

अलिकडे जिलेबी बनवण्याचे अनेक प्रकार आहेत. जिलेबी पनीरपासून बनवली जाते, कधी कधी खव्यापासून बनवलेली जिलेबी चवीला आणि रंगही छान असतो. सामान्यतः जिलेबी लहान आणि वक्र शैलीत बनवली जाते. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या जिलेबी आढळतात, ज्या सामान्य जिलेबीपेक्षा आकाराने मोठ्या असतात.

First published:
top videos

    Tags: Food, Tasty food