• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • 107 वर्षे 300 दिवस; जुळ्या बहिणींनी केला अनोखा World record

107 वर्षे 300 दिवस; जुळ्या बहिणींनी केला अनोखा World record

वयाच्या 107 व्या वर्षी जुळ्या बहिणींनी केला विश्वविक्रम.

  • Share this:
टोकियो, 22 सप्टेंबर : जपानी लोक दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे जपानच्या (Japan) नावावर दोन खास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची (Guinness World Record) नोंद झाली आहे. यात पहिला विक्रम जपानमधील जिरोमोन किमुरा यांच्या नावावर होता. जिरोमोन हे सर्वाधिक 116 वर्ष आयुष्य जगणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले होते. 2013 मध्ये त्यांचं निधन झालं. टानाका नामक जपानी महिला सध्या जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असून, तिचं वय 118 वर्ष आहे. पण आता जपानच्या नावावर सर्वात जास्त काळ जगण्याशी संबंधित आणखी एका विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. हा विश्वविक्रम नोंदवला आहे जुळ्या बहिणींनी (Twins Sister world record). जपानमधील (Japan) उमेनो सुमियामा (Umeno Sumiyama) आणि कोइमे कोदामा (Koume Kodama) या जगातील सर्वात वयोवृद्ध जुळ्या बहिणी (Oldest Twins Sister) ठरल्या आहेत. या बहिणींचं नाव आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.  1 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचं वय 107 वर्ष 300 दिवस होतं.
उमेनो आणि कोइमे यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1913 मध्ये जपानमधील शोडो आयलॅण्ड (Shodo Island) इथं झाला. त्यांच्या कुटुंबात 13 सदस्य होते. या दोन्ही बहिणी सकारात्मक विचारसरणीच्या असून, त्या कधीही चिंता करत नाहीत. उमेनो या दृढ इच्छाशक्ती असलेल्या तर कोइमे या सौम्य स्वभावाच्या आहेत, असं या दोघींच्या कुटुंबीयांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना सांगितलं. हे वाचा - मस्क्युलर, पॉप्युलर! 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर जागतिक महायुद्ध (World War) आम्ही अगदी जवळून अनुभवलं, असं या दोघी बहिणी नमूद करतात. 'दुसऱ्या महायुद्धादरम्यान मला माझं घर सोडावं लागलं. कारण तिथं हवाई हल्ल्यांपासून बचावासाठी आश्रयस्थान उभारण्यात आली होती. त्यानंतर हळूहळू युद्ध थांबलं', असं उमेनो यांनी सांगितलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन स्वतंत्र कुटुंबांमध्ये आमचा विवाह झाल्याचं या दोन्ही बहिणींनी सांगितलं. उमेनो यांचा विवाह शोडो आयलॅण्डमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत झाला. तर कोइमे यांचा विवाह आयलॅण्डबाहेरील एका व्यक्तीशी झाला. एक वेळ अशी होती की या दोघी बहिणी एकमेकींपासून 300 किलोमीटर अंतरावर राहत होत्या. सण-समारंभानिमित्तानं त्या एकत्र येत. हे वाचा - 12 वर्षांचा संसार मोडून चौथ्या मुलाचा बाप बनण्याच्या तयारीत 'हा' फुटबॉलर! कोइमे यांच्या कुटुंबियांनी सांगितलं की जेव्हा त्यांची बहिण वयोवृद्ध होऊ लागली तेव्हापासून ती आपलं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट व्हावं, असं स्वप्न बघत होती. परंतु आपलं स्वप्न सत्यात उतरेल याचा अंदाज त्यांना नव्हता. कोइमे यांची स्मृती (Memory) कमजोर झाली असल्यानं त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं महत्त्व समजत नव्हतं. या दोघी बहिणी सध्या वृद्धाश्रमात राहतात आणि या पुरस्कारामुळं त्यांच्या कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलं आहे.
First published: