• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • मस्क्युलर, पॉप्युलर! 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर

मस्क्युलर, पॉप्युलर! 'ही' आहे जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर

 मारियाची उंची सहा फूट आहे आणि तिचं वजन 90 किलो आहे. आपल्या करिअरच्या सुरुवा

मारियाची उंची सहा फूट आहे आणि तिचं वजन 90 किलो आहे. आपल्या करिअरच्या सुरुवा

मारियाची उंची सहा फूट आहे आणि तिचं वजन 90 किलो आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला तिने वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : बॉडीबिल्डर म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर मोठेमोठे मसल्स असणारे पुरुष येतात. बॉडीबिल्डिंग करणाऱ्या महिला (Female bodybuilders) हे अजूनही आपल्याला तेवढं सवयीचं झालेलं नाही; मात्र इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे या क्षेत्रातही महिला मागे नाहीत. कित्येक क्षेत्रांमध्ये तर महिला पुरुषांच्याही पुढे निघून गेल्या आहेत. यामुळेच काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या बॉडीबिल्डिंग क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात महिला (Females in Body building) दिसून येत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची ओळख करून देणार आहोत, जिला पाहून भल्या-भल्या बॉडीबिल्डर पुरुषांनाही घाम फुटतो. नेदरलँडमध्ये राहणारी मारिया वॅटेल (Maria Wattel) ही एक जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर आहे. एवढंच नाही, तर ती जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डरही (World’s tallest female body builder) आहे. कित्येक महिला बॉडीबिल्डर फोटोंमध्ये उंच दिसतात; मात्र खऱ्या आयुष्यात कमी उंचीच्या असतात. मारिया मात्र खरोखरच फोटोंमध्ये दिसते तशीच उंच आहे. जगातली सर्वांत उंच महिला बॉडीबिल्डर (Tallest female bodybuilder) म्हणून तिचं नाव गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही (Guinness book of world records) नोंदवण्यात आलं आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
  मारियाची उंची सहा फूट आहे आणि तिचं वजन 90 किलो आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला तिने वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं. यानंतर तिला बॉडिबिल्डिंगमध्ये (Maria bodybuilding) रुची निर्माण झाली. पुढे तिने यावरच लक्ष केंद्रित केलं आणि 2016 मध्ये तिने IIFB बॉडिबिल्डिंग प्रो कार्ड (IIFB Pro) जिंकून दाखवलं. बॉडीबिल्डिंगमध्ये करिअर करण्याच्या एका निर्णयामुळे मारियाचं जगच बदललं. पुढे आपल्या मेहनतीच्या बळावर तिने बऱ्याच स्पर्धांमध्ये बाजी मारली. मारिया जिमप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. आपले वर्कआउट सेशन्स, स्टेज कॉम्पिटिशन यांचे फोटो आणि व्हिडिओ ती नियमितपणे शेअर करत असते. आपले फोटो (Maria Wattel workout) आणि व्हिडिओ पाहून इतर महिलांनाही याबाबत प्रेरणा मिळावी या उद्देशाने ती या गोष्टी शेअर करत असते. SRPF Recruitment: राज्य राखीव पोलीस बल मुंबई इथे 'या' पदासाठी नोकरीची संधी 30 वर्षांच्या मारियाचे इन्स्टाग्रामवर (Maria Wattel Instagram) 43 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या फोटोंना आणि व्हिडिओंना हजारो लाइक्स मिळत असतात. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने शेअर केलेल्या तिच्या फोटोलाही 50 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एक महिला म्हटल्यावर ती नाजूकच असेल असा कयास कित्येक जण बांधतात; मात्र मारियाला पाहिल्यानंतर या व्यक्तींनाही आपल्या संकल्पना बदलाव्या लागतात. कारण, मारिया ही केवळ इतर महिलांपेक्षाही नाही, तर कित्येक पुरुषांपेक्षाही अधिक मस्क्युलर आहे!
  First published: