ब्राझीलचा (Brazil) प्रसिद्ध फुटबॉलर हल्क (Hulk) याने आपला 12 वर्षांचा सुखी संसार मोडून आपल्या पत्नीच्या भाचीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना लग्नाआधीच एक मूल होणार असून त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या Instagram Account वरून दिली आहे. त्यामुळे आता या प्रेमकहानीची जेवढी चर्चा होत आहे तेवढीच त्यावर टीकाही होत आहे.