• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • कोरोनावर भारी पडतोय Natto; व्हायरसशी लढणारा सुपर ब्रेकफास्ट

कोरोनावर भारी पडतोय Natto; व्हायरसशी लढणारा सुपर ब्रेकफास्ट

Natto हा पदार्थ कोरोनाशी लढण्यात सक्षम असल्याचं संशोधनात दिसून आलं आहे.

 • Share this:
  टोकियो, 28 जुलै :  कोणत्याही आजाराशी दोनहात करण्यासाठी महत्त्वाचा असतो तो आहार. ज्यामुळे आजाराशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मिळते, बळ मिळतं. काही पदार्थांमध्ये असे घटक असतात जे आरोग्याच्या बऱ्याच समस्यांवर फायदेशीर ठरतात. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला आणि थैमान घालणारा आजार म्हणजे कोरोनाव्हायरस लढण्यासाठी प्रत्येक मार्गाने प्रयत्न केला जातो आहे. विविध औषधं आणि लशी सध्या उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय बचावासाठी लोक काढे वगैरेही करून पित आहेत. पण आता एक कोरोनाशी लढणारा प्रभावी असा सुपर ब्रेकफास्टही सापडला आहे (Natto fight with coronavirus). जापनीज ब्रेकफास्ट (Japanese breaskfast Natto) नाट्टो (Natto) हा कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.  जपानमध्ये हा पदार्थ नाश्त्याला सर्रास खाल्ला जातो.  मातीत आढळणाऱ्या Bacillus subtilis या जिवाणूच्या साह्याने सोयाबीन (Soyabean) आंबवून (Fermentation) त्यापासून नाट्टो हा पदार्थ तयार केला जातो. हा पदार्थ कोविड-19 साठी कारणीभूत असलेल्या SARS COV-2 या विषाणूविरोधात प्रभावी ठरू शकतो, असं शास्त्रज्ञांना प्रयोगादरम्यान आढळलं आहे. टोकियो युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी (TUAT) या विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. नाट्टो (Natto) हा पदार्थ चिकट असतो आणि त्याचा गंध उग्र असतो. त्या पदार्थाचा अर्क कोरोना विषाणूंची पेशींमध्ये संसर्ग करण्याची क्षमता (Ability to infect) नष्ट करू शकतो, असं शास्त्रज्ञांना आढळलं आहे. बायोकेमिकल अँड बायोफिजिकल रिसर्च कम्युनिकेशन्स या जर्नलमध्ये या ताज्या अभ्यासाविषयीचा लेख प्रसिद्ध झाला आहे. हे वाचा - कोरोनावरील लस आता गोळीच्या रुपात, नवा शोध ठरणार जगासाठी वरदान विद्यापीठातल्या संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक तेत्सुया मिझुतानी यांनी सांगितलं, नाट्टो हा पदार्थ आरोग्यासाठी चांगला असल्याचं जपानी लोक मानतात आणि हा पदार्थ नाश्त्याला खाण्याची परंपरा आहे. आरोग्यासाठी चांगला असल्याचा समज दृढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक शास्त्रीय पुरावे गेल्या काही वर्षांतल्या अभ्यासातून मिळाले आहेत. आत्ता केलेल्या ताज्या अभ्यासात नाट्टोमध्ये असलेले विषाणूरोधक गुणधर्म सार्स-सीओव्ही टूच्या अनुषंगाने तपासण्यात आले. तसंच गायी-गुरांमध्ये श्वसनसंस्थेशी संबंधित विकार घडवून आणण्यासाठी कारणीभूत असलेल्या बोव्हाइन हर्पिसव्हायरसच्या (BHV-1) विरोधातही नाट्टो हा पदार्थ किती प्रभावी ठरतो, हे तपासण्यात आलं. शास्त्रज्ञांनी नाट्टो हा पदार्थ गरम करून आणि गरम न करता अशा दोन प्रकारे त्याचा अर्क काढला. हा अर्क मानवाच्या आणि गायीच्या प्रयोगशाळेत वाढवलेल्या पेशींच्या समूहात घालण्यात आला. मानवी पेशींमध्ये सार्स-सीओव्ही टू या विषाणूचा संसर्ग झालेला होता, तर गायीच्या पेशींमध्ये बोव्हाइन हर्पिसव्हायरसचा संसर्ग झालेला होता. उष्णता न देता काढण्यात आलेला अर्क दोन्ही प्रकारच्या विषाणूंची पेशींना संसर्ग करण्याची क्षमता नाहीशी करण्यात यशस्वी ठरल्याचं आढळलं. तसंच, उष्णता देऊन काढण्यात आलेल्या अर्काचा कोणताही परिणाम दोन्ही विषाणूंवर झाला नसल्याचंही स्पष्ट झालं. नाट्टोच्या अर्कामध्ये प्रोटीएजेस (Proteases) असतात. ही प्रथिनं अन्य प्रथिनांचं पाचन करतात. ही प्रोटीएजेस सार्स सीओव्ही टू (SARS-COV-2) या विषाणूच्या स्पाइक प्रोटीनवरच्या (Spike Protein) रिसेप्टर बाइंडिंग डोमेनचं (Receptor Binding Protein) पाचन करून टाकतात. त्यामुळे हा विषाणू पेशींना धरू शकत नाही, त्यात जाऊ शकत नाही. कारण ज्याद्वारे तो संबंधित पेशीला बांधला जातो, ते साधनच नष्ट होतं, असं मिझुतानी यांनी सांगितलं. बोव्हाइन हर्पिसव्हायरसच्या बाबतीत आणि अल्फा कोविड व्हेरिएंटच्या बाबतीतही अशाच पद्धतीने परिणाम साधल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं. नाट्टोला उष्णता दिल्यास त्यातल्या प्रोटीएजेसचं विघटन होतं आणि त्यामुळे ती अन्य प्रथिनांना पचवू शकत नाहीत. त्यामुळेच उष्णता दिलेल्या नाट्टोपासून काढण्यात आलेल्या अर्काचा विषाणूंवर काहीच प्रभाव न पडल्याचं आढळलं, असं मिझुतानी यांनी स्पष्ट केलं. हे वाचा - काय? आता Fart मुळेही कोविडचा धोका! ढुसकी सोडली तरी पसरू शकतो कोरोना? या संशोधनाचे प्राथमिक निष्कर्ष दिलासादायक असले, तरी रेण्वीय पातळीवर (Molecular Level) हे योग्य पद्धतीने काम करतंय की नाही, हे पाहणं आवश्यक असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. केवळ नाट्टो हा पदार्थ खाऊन विषाणूचा संसर्ग कमी होत असल्याचा निष्कर्ष यातून काढला जाऊ नये, असंही शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. एकदा यातल्या घटकांचा योग्य पद्धतीने अभ्यास करून त्यांची कार्यं कळली, की शास्त्रज्ञ प्राण्यांवर या प्रयोगाच्या चाचण्या घेणार आहेत. त्यानंतरच काही ठोस निष्कर्ष काढले जाऊ शकतात.
  First published: