मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मनसोक्त रडा! Tear Teacher देतो रडण्याचे धडे; डोळ्यातून अश्रू काढण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग

मनसोक्त रडा! Tear Teacher देतो रडण्याचे धडे; डोळ्यातून अश्रू काढण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग

एखाद्याला हसवण्याचा प्रयत्न आपण करतो पण मुद्दाम कुणालातरी रडवणं (crying) हे काही मात्र आपल्या पचनी पडत नाही. मग हा शिक्षक रडण्याचं ट्रेनिंग का देतो? यामागे नेमकं काय लॉजिक आहे?

एखाद्याला हसवण्याचा प्रयत्न आपण करतो पण मुद्दाम कुणालातरी रडवणं (crying) हे काही मात्र आपल्या पचनी पडत नाही. मग हा शिक्षक रडण्याचं ट्रेनिंग का देतो? यामागे नेमकं काय लॉजिक आहे?

एखाद्याला हसवण्याचा प्रयत्न आपण करतो पण मुद्दाम कुणालातरी रडवणं (crying) हे काही मात्र आपल्या पचनी पडत नाही. मग हा शिक्षक रडण्याचं ट्रेनिंग का देतो? यामागे नेमकं काय लॉजिक आहे?

टोकियो, 03 नोव्हेंबर : एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवणं आपण ऐकलं आहे पण त्याला मुद्दाम रडायला (crying) लावणं, असं कधी आपण ऐकलं नाहीत. त्यातही विशेष म्हणजे रडण्यासाठी खास ट्रेनिंग दिलं जातं. टिअर शिक्षक (tear teacher) म्हणून अश्रू (tear) शिक्षक रडण्याचं प्रशिक्षण देतो. आतापर्यंत विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास अशा विषयांचे शिक्षक ऐकले आहेत पण अश्रू किंवा रडवणारा शिक्षकही आपण कधी ऐकलं नाही. आता हा शिक्षक असं का करतो त्यामागे नेमकं लॉजिक काय आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.

सध्याच्या काळात लोकांचे जगणं चिंता, विवंचनेनं वेढलं गेलं आहे. पण हेच जगणं आणखी सुकर करून देणारा एक फंडा आला आहे. जपानमधील हिडेफूमी योशिदा नावाचा शिक्षक आयुष्यातील ताणतणाव दूर करून जगण्याचा मंत्र देतो आहे. सगळा तणाव बाजूला सारून काही दिवसांतून एकदा तरी मनसोक्त रडून घेण्याचा सल्ला योशिदा देतो. एवढंच नाही तर त्यासाठी योशिदा लोकांना प्रोत्साहितही करतात. रडण्यामुळे तणाव निवळतो, असा दावा करणारे योशिदा त्यासाठी खास ट्रेनिंगही देतात. रडण्याच्या या पद्धतीमुळे होणारे फायदे ते लोकांना सांगतात.

मूळातच आशियायी देशांचा रडण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. लोकांची ही धारणा बदलण्यासाठी 45 वर्षीय योशिदा यांनी आयुष्याची आठ वर्षे खर्ची घातली आहेत. योशिदा यांच्या मते जपानी लोकांना सहजगत्या रडणारे म्हणून ओळखलं जातं. मात्र मुलं किंवा प्रौढ माणसं रडत असतील तर त्यांना तसं करण्यापासून रोखलं जातं. त्यासाठी चारचौघात रडणाऱ्याला कमकुवत मनाचाही ठरवतात. आपल्या भारतातही तसंच केलं जातं. लोकांची हीच मानसिकता बदलण्याचे काम योशिदा करत आहेत. रडण्याच्या पद्धती ते लोकांना शिकवत आहेत.  तापर्यंत म्हणजे गेल्या साडेसात वर्षांत जवळपास 50 हजारांहून जास्त लोकांना त्यांनी रडायचं कसं याचं ट्रेनिंगही दिलं आहे.

हे वाचा - चोरीला गेलेल्या सायकलमध्ये अडकला होता त्याचा जीव; पोलिसांनी काढली शोधून

उच्च विद्यालयात शिक्षक राहिलेले योशिदा स्वत:ला नमिदा सेन्से (अश्रू शिक्षक) म्हणवून घेतात आणि रडण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या आपल्या तंत्राला ते रुई कत्सू असं संबोधतात. ढोबळमानाने याचा अर्थ अश्रू मागणारा असा होतो. जपानमध्ये देशभर योशिदा यांच्या कार्यशाळा, व्याख्यानं सातत्यानं सुरू असतात. आठवड्यातून एकदा रडण्यामुळे होणारे फायदे सांगतानाच त्यासाठी मदत ते करत असतात. आठवड्यातून एकदा रडलात तरी तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकता. तणाव निवळण्यासाठी रडण्याची क्रिया ही हसणं किंवा झोपण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरते, असं योशिदा यांनी जपान टाईम्सशी बोलताना सांगितलं आहे.

हे वाचा - पायांनाच बनवले आपले हात आणि घेतली गगनभरारी; अपंग महिला पायलटच्या जिद्दीला सलाम

आपल्या मानसिक घुसमटीचा निचरा डोळ्यांवाटे अश्रूच्या रूपाने कसा करायचा हे हिडेफुमी योशिदा यांनी लोकांना शिकवलं आहे. रडण्यामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते. रडण्याने पॅरासिम्पेथेटिक हालचालींना उत्तेजना मिळते. यातून हृदयक्रिया संथ होते आणि मेंदूवर त्याचा सुखद असा प्रभाव होतो. जेवढ्या मोठ्यानं रडाल तितकं तुम्हाला मन मोकळं झाल्यासारखं वाटेल. जोरजोराने रडणं चांगलंच आहे, असा दावा योशिदा यांनी केला आहे. तणावामुळे मानसिक कोंडमारा होत असेल तर डोळ्यांवाटे ढाळलेला एक अश्रूदेखील तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार ठरू शकेल, असंही योशिदा यांचं म्हणणं आहे.

First published:
top videos

    Tags: Health, Lifestyle, Teacher, Tears