Home /News /heatlh /

Jogging For Health : दिवसभरात 7000 पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी? संशोधनातून मोठा खुलासा

Jogging For Health : दिवसभरात 7000 पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होतो कमी? संशोधनातून मोठा खुलासा

मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटी (University of Massachusetts) च्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या संशोधनात 11 वर्षात 2000 लोकांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे रिस्क कमी होत आहे, असा दावा करण्याता आला आहे.

पुढे वाचा ...
    दिल्ली, 13 सप्टेंबर : ग्रामीण आणि शहरांतील लोकसंख्या दररोज सकाळी व्यायाम (Exercise) करण्यासाठी बाहेर पडत असते. त्यामुळे आरोग्य (Health) राखण्यास मोठी मदत होते आहे. दिवसभरात कामामुळे व्यस्त असणाऱ्या लोकांना अनेकदा सकाळी व्यायामासाठी उठणे शक्य होत नाही. अशा वेळी त्यांना फिटनेस (Fitness) राखणे जमत नाही. परंतु तरीही ते सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी वेळ काढून व्यायाम करताना दिसतात. हे करणे तुम्हालाही शक्य नसेल, परंतु आपण आपली कामं करत असताना दररोज किमान 7000 पावलं पायी चालत गेलो तर आपल्याला अनेक रोगांपासून आपला बचाव करता येऊ शकतो. त्याचसंदर्भातील एका संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता फिटनेस राखणं हे फक्त चालण्यानेही शक्य होणार आहे. हेल्थलाइनमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार जी लोक दररोज 7000 पावलांची पायपीट करतात, त्यांना इतर लोकांच्या तुलनेत काही गंभीर आजारांचा धोका कमी असतो. मॅसाचुसेट्स यूनिवर्सिटी (University of Massachusetts) च्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या संशोधनात 11 वर्षात 2000 लोकांवर हा रिसर्च करण्यात आला आहे. यात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचे रिस्क कमी होत आहे, असा दावा करण्याता आला आहे. केवळ Metabolism बुस्ट करून फिगर करा मेन्टेन; 'या' गोष्टींची घ्या काळजी जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) सल्ला काय? जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्यविषयक सल्ल्यानुसार वृद्धांना आठवड्याभरात किमान 150 मिनिटं वॉकिंग करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आता वृद्धांसह तरूणांना या संशोधनातून समोर आलेल्या माहितीचा फायदा होणार आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Fitness, Health, Health Tips

    पुढील बातम्या