Home /News /lifestyle /

कोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग

कोरोनामुळे वडिलांची नोकरी गेली; कॉलेजमध्ये शिकणाऱ्या लेकीनं बाबांसह हाती धरलं रिक्षाचं स्टेअरिंग

21 व्या वयात या तरुणीनं शिक्षण घेता घेता वडिलांना मदत करत आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा निर्णय घेतला.

जम्मू-काश्मीर, 17 जानेवारी : कोरोनाच्या (Corona era) या संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे काहींनी पर्याय निवडत रोजगार निर्माण केला तर काहींनी संकटात धीर सोडला. या काळात आपण अनेक जणांनी धीराने या संकटाला तोंड दिल्याच्या आणि त्यांच्याकडून प्रेरणा मिळायच्या कथा ऐकल्या आहेत. अशीच कथा जम्मू काश्मीरमधून (Jammu Kashmir) समोर आली असून येथील एका 21 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी रिक्षाचं स्टेअरिंग हाती धरलं आहे. सामान्यपणे मुलींकडून रिक्षा चालवण्याची अपेक्षा केली जात नाही. पण जम्मू काश्मीरमधील मुलीने ते करून दाखवलं. उधमपूर(Udhampur) जिल्ह्यातील बंजीत कौर (Bnjeet Kaur) या 21 वर्षीय मुलीने हे धाडसी पाऊल उचललं आहे. तिच्या वडिलांची ड्रायव्हरची नोकरी गेल्यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. पण त्यांच्या कुटुंबाची गरज भागेल इतकं उत्पन्न त्यातून मिळत नव्हतं. यामुळे वडिलांसह बंजीतनंही रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला आणि कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावला. एएनआयशी (ANI) बोलताना बंजीतनं सांगितलं, वडिलांच्या रिक्षा व्यवसायातून जास्त कमाई होत नाही. त्यामुळे तिनं स्वतःही रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. ती महाविद्यालयीन शिक्षण घेते आहे आणि मिळालेल्या वेळेत रिक्षा चालवते. तिच्या या निर्णयाला घरातून देखील पाठिंबा आहे. बंजीत कौर हिची बहिण दविंदर कौर हिलादेखील रिक्षा चालवायला येते. आपल्या बहिणीच्या या कार्यात पाठिंबा असून तिच्या या कार्यामुळे अनेकजण प्रेरित होत असल्याचे तिनं म्हटलं आहे. हे वाचा - गोठ्यात अभ्यास करून ती पोहोचली न्यायाधीशाच्या खुर्चीपर्यंत बंजीतला सुरक्षा दलामध्ये (Defence Forces) करिअर करण्याची इच्छा आहे. बंजीतचे वडील सरदार गोरख सिंग एएनआयशी (ANI) बोलताना म्हणाले, माझी ड्रायव्हरची नोकरी गेल्यानंतर मला मुलींनी रिक्षा चालवायला शिकवलं यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे.  तिच्या रिक्षा चालवण्याच्या निर्णयामुळे मला खूप मदत होत आहे. मला तिचा खूप अभिमान वाटतो. तिनं कोणतंही करिअर केल्यास तिला माझा पाठिंबा आहे. उधमपूरच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO) रचना शर्मा म्हणाल्या, वडिलांच्या मदतीसाठी रिक्षा चालवणाऱ्या बंजीत कौर सारख्या मुली समाजासाठी खूप उत्तम उदाहरण आहेत. हे वाचा - दिल्लीतल्या केवळ वीस महिन्यांच्या या चिमुकलीनं मरताना वाचवले पाच जणांचे प्राण... दरम्यान यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील पूजा देवीनं (Pooja Devi) काश्मीरची पहिली महिला बस ड्रायव्हर बनत इतिहास घडवला आहे. तीन मुलांची आई पूजा देवी यांनी नुकतंच कठुआ ते जम्मू रस्त्यावर प्रवाशी बस चालवली. केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनीही ट्विटरवर पूजाचे फोटो शेअर करत तिचं कौतुक केलं होतं. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील पहिल्या महिला बस चालक पूजा देवीचा अभिमान असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Career, Corona, Woman, Woman Driver

पुढील बातम्या