मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त 20 महिन्यांच्या गोंडस चिमुकलीनं मरताना वाचवले पाच जणांचे प्राण...

फक्त 20 महिन्यांच्या गोंडस चिमुकलीनं मरताना वाचवले पाच जणांचे प्राण...

अवयवदान हेच श्रेष्ठ दान असं आजच्या काळात म्हटलं जातं. दिल्लीतल्या एका जोडप्यानं हा विचार जगत आदर्श उभा केला आहे.

अवयवदान हेच श्रेष्ठ दान असं आजच्या काळात म्हटलं जातं. दिल्लीतल्या एका जोडप्यानं हा विचार जगत आदर्श उभा केला आहे.

अवयवदान हेच श्रेष्ठ दान असं आजच्या काळात म्हटलं जातं. दिल्लीतल्या एका जोडप्यानं हा विचार जगत आदर्श उभा केला आहे.

नवी दिल्ली, 14 जानेवारी : आपल्या आयुष्यातील केवळ 20 महिन्यांचा काळ जगल्यानंतर एक चिमुकली मोठ्या अपघातात बळी ठरली. धनिष्ठा नावाच्या या बालिकेचा जीव गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचे अवयव दान करण्याचं ठरवलं. धनिष्ठा आता देशातील सर्वात लहान ऑर्गन डोनर (youngest organ donor) बनली आहे. अवयवदानाबाबत (organ donation) आता देशात बरीच जनजागृती होते आहे. मात्र गरजूंना कठीण वेळी अनेकदा अवयवदाता (organ donor) मिळणं अतिशय अवघड होऊन बसल्याचं दिसतं. दिल्लीत मात्र एक अतिशय सुखद वास्तव समोर आलं आहे.

धनिष्ठाचं हृदय (heart), किडनी (kidney), यकृत आणि दोन्ही कॉर्निया यामाध्यमातून पाच कोवळ्या जीवांना नवजीवन मिळालं आहे.

दिल्लीच्या (Delhi) रोहिणी भागात राहणारी धनिष्ठा 8 जानेवारीला अचानक घराच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडली. तिला गंभीर जखमा झाल्या. आई-वडील तिला घेऊन धावतपळत गंगाराम हॉस्पिटलला (hospital) पोचले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले मात्र 11 जानेवारीला हतबल होत त्यांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं.

धनिष्ठाचे वडील म्हणाले, 'डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, की धनिष्ठा ब्रेन डेड (brain dead) झाली आहे. तिला पुन्हा आपण परत आणू शकत नाही. आम्ही हॉस्पिटलमध्ये असतानाच आम्हाला असे काही पालक भेटले जे आपल्या मुलांना जीवदान मिळण्याची तळमळून वाट पाहत होते. मग मीच डॉक्टरांना विचारलं, की आम्ही आमच्या मुलीचे अवयव दान करू शकतो का? यावर ते म्हणाले, की तुम्ही नक्कीच असं करू शकता. आता मी आणि पत्नीनं हा निर्णय घेतला. आमची मुलगी आता इतर चिमुकल्यांमध्ये जिवंत राहील याचं समाधान असेल.'

First published:

Tags: Brain, Organ donation