मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गोठ्यात अभ्यास करून ती पोहोचली न्यायाधीशाच्या खुर्चीपर्यंत; दूधवाल्याच्या मुलीची प्रेरणादायी यशोगाथा

गोठ्यात अभ्यास करून ती पोहोचली न्यायाधीशाच्या खुर्चीपर्यंत; दूधवाल्याच्या मुलीची प्रेरणादायी यशोगाथा

 प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या या मुलीचं नाव सोनल शर्मा (Sonale Sharma) आहे. सोनलनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवलं असून, अनेक मुलींसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे.

प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या या मुलीचं नाव सोनल शर्मा (Sonale Sharma) आहे. सोनलनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवलं असून, अनेक मुलींसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे.

प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या या मुलीचं नाव सोनल शर्मा (Sonale Sharma) आहे. सोनलनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवलं असून, अनेक मुलींसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
जयपूर, 30 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan) एका दूधवाल्याच्या (Milkman) मुलीनं कायद्याच्या (Law)सर्व परीक्षांमध्ये पहिला क्रमांक मिळवण्याचा विक्रम करत, सत्र न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीशपदी (First Class Session Judge) विराजमान होण्याचा मान पटकावला आहे. अत्यंत अभिमानस्पद आणि प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या या मुलीचं नाव सोनल शर्मा (Sonale Sharma) आहे. सोनलनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळवलं असून, अनेक मुलींसाठी ती प्रेरणास्थान बनली आहे. गोठ्यात बसून अभ्यास करत, बी.ए, एलएलबी आणि एलएलएम या परीक्षांमध्ये सोनलनं प्रथम क्रमांक पटकावला होता, त्याही पुढे जाऊन तिनं न्यायाधीशपदाची परीक्षाही यशस्वीपणे पार केली, तिच्या या गौरवास्पद कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोनलनं 2018 मध्ये झालेल्या राजस्थान ज्युडीशीयल सर्व्हिसेसच्या (Rajasthan Judicial Services) न्यायाधीश पदासाठी परीक्षा उत्तीर्ण होत, प्रथम वर्ग सत्र न्यायाधीशाचं पद प्राप्त केलं आहे. एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर तिची सत्र न्यायाधीशपदी नियुक्ती केली जाईल. सोनलनं हे यश मिळवण्यासाठी किती कष्ट केले आहेत, हे बघितलं तर अशी कतृत्ववान मुलगी आपल्याला असावी असं प्रत्येक आई-बापाला वाटेल, यात शंका नाही. उदयपूरमध्ये राहणाऱ्या सोनलचे वडिल खयालीलाल शर्मा यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे. सोनल आपल्या वडिलांना त्यांच्या कामात मदत करते. त्यामुळं तिचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. गायींचा गोठा साफ करणे, शेण गोळा करणे अशी सगळी कामं केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील घरामध्ये दूध पोचवण्याचे काम ती करते. कोणत्याही परीक्षेच्या काळात तिच्या या दिनक्रमात फारसा खंड पडला नाही. या सर्व कामांनंतर ती सायकलवरून कॉलेजला जात असे. कोणताही क्लास तिनं लावला नव्हता, महागड्या पुस्तकांचा खर्च परवडत नसल्यानं ती कॉलेजचे वर्ग सुरू होण्याआधी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत असे. घरी आल्यावर गायींच्या गोठ्यात त्यांची काळजी घेत, तिथंच एका कोपऱ्यात तेलाच्या रिकाम्या डब्यांवर फळी टाकून बनवलेल्या टेबलावर ती अभ्यास करत असे. तिच्या वह्या पुस्तकांचा खर्चदेखील तिच्या पालकांना परवडत नव्हता, त्यासाठी त्यांनी कर्ज काढून खर्च भागवला. याची जाणीव असणाऱ्या सोनलनं प्रचंड मेहनत करून बी. ए, एलएलबी आणि एलएलएम या सर्व परीक्षांमध्ये अव्वल स्थान मिळवलं. त्यानंतर न्यायाधीशपदाच्या परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली; मात्र अवघ्या एका गुणानं तिची प्रथम वर्ग सत्र न्यायाधीशपदाची नियुक्ती हुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पदासाठी निवड झालेल्या काही उमेदवारांनी या नोकरीत रुजू होण्यास नकार दिल्यानं त्या रिक्त जागा इतर उमेदवारांकडून भरण्यास सरकारनं मंजूरी दिली याचा लाभ होऊन सोनल या यादीत पुढच्या स्थानावर गेली, अशी माहिती तिचे मार्गदर्शक सत्येंद्र सिंग यांनी दिली. सोनलनं न्यायाधीशपदाच्या सात जागा रिकाम्या असल्यानं, आपल्या नियुक्तीचा विचारा व्हावा, अशी रिट पिटीशन (Writ Petition)राजस्थान उच्च न्यायालयात (Rajasthan High Court) सप्टेंबरमध्ये दाखल केली. त्यावर नुकताच न्यायालयानं निकाल देत, तिची प्रथम वर्ग न्यायाधीशपदी या पदावर नियुक्ती करण्याचा आदेश दिला आणि सोनलचा लढा यशस्वी झाला. सोनल आपल्या यशाचं सगळं श्रेय आपल्या आई-वडिलांनां देते. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी तिला इतकं शिकवलं शिक्षणासाठी कर्जही घेतलं, आपल्या आई-वडिलांचा अतिशय अभिमान वाटत असल्याचं तिनं सांगितलं. ‘शाळेत असताना माझ्या चपलांना शेण लागलेलं असायचं, त्याचा घाण वास यायचा, मी दुधवाल्याची मुलगी आहे, याची मला खूप लाज वाटायची पण माझ्या आई- वडिलांनी मला इतकं शिकण्याची संधी दिली, त्यासाठी खूप कष्ट घेतले; त्यामुळं मला त्यांचा अतिशय अभिमान वाटतो’, अशा शब्दात सोनलनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
First published:

Tags: Success story

पुढील बातम्या