मुंबई, 13 जून : भोपळ्याची भाजी जवळपास सगळेच खातात. भोपळा ही अशा भाज्यांपैकी एक आहे, जी प्रत्येक हंगामात सहज उपलब्ध असते. म्हणूनच अनेक लोक भोपळ्याच्या पदार्थांचा आहारात समावेश करतात. तर काही लोकांना भोपळा खायला अजिबात आवडत नाही. मात्र, भोपळ्याचा स्कीनसाठीही चांगला उपयोग होतो हे फार कमी लोकांना माहीत आहे. स्कीन केअरमध्ये भोपळा कसा वापरायचा याविषयी जाणून (Pumpkin benefit for skin) घेऊया. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व ऋतूंमध्ये आढळणाऱ्या भोपळ्याचा वापर प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. विशेषत: उन्हाळ्यात त्वचेच्या प्रकारानुसार भोपळ्याचा फेस पॅक तयार करून आपण त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवू शकतो. त्वचेच्या प्रकारानुसार भोपळ्याचा वापर आणि त्याचे काही फायदे जाणून घेऊया. कोरड्या त्वचेवर भोपळा गुणकारी - उन्हाळ्यात काही लोकांची त्वचा खूप कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत भोपळ्याच्या फेस पॅकच्या मदतीने आपण त्वचेची आर्द्रता परत मिळवू शकता. यासाठी भोपळा बारीक करून त्याची पेस्ट बनवा. 2 चमचे भोपळ्याच्या पेस्टमध्ये 1 चमचे दूध आणि 4 चमचे साखर घालून मिक्स करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. त्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी आणि ब्लॅकहेड्स निघून जातील आणि तुमची त्वचा मुलायम वाटू लागेल. नॉर्मल त्वचेवर देखील वापरा - सामान्य प्रकारच्या त्वचेवर चमक आणण्यासाठी भोपळ्याचा फेस पॅक अतिशय प्रभावी उपाय आहे. भोपळ्याचा फेस पॅक नैसर्गिक असून त्याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. भोपळ्याचा फेस पॅक बनवण्यासाठी भोपळा बारीक करून घ्या. त्यात 1 चमचा मध, 1 चमचा दूध आणि 1 चमचा दालचिनी पावडर मिसळून पेस्ट बनवा. आता हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा. हे वाचा - Skin Care Tips: ‘हे’ घरगुती उपाय करा अन् चेहऱ्यावरील पिंपल्सपासून मिळवा मुक्तता तेलकट त्वचेवर वापरा - तेलकट त्वचेचे अतिरिक्त तेल कमी करून नैसर्गिक चमक आणण्यासाठी भोपळ्याचा फेस पॅक प्रभावी ठरू शकतो. यासाठी भोपळा बारीक करून त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये थोडेसे सफरचंद सायडर व्हिनेगर आणि 1 चमचा साखर घाला आणि मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हा उपाय करून पाहिल्यास चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमचा चेहरा चमकू लागेल. हे वाचा - चिकनवर ताव मारणाऱ्यांना कोंबडीविषयी ‘ही’ गोष्ट नक्की माहीत नसणार (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.