कोरोना रुग्णांना Ivermectin देऊ नका; भारतात औषधाचा वापर सुरू होताच WHO ने केलं सावध

कोरोना रुग्णांना Ivermectin देऊ नका; भारतात औषधाचा वापर सुरू होताच WHO ने केलं सावध

भारतात गोव्यात आयव्हरमेक्टीन (Ivermectin) या औषधाला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनामुळे (Corona) गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमधील वैज्ञानिक, शास्त्रज्ञ औषधं, लस संशोधनावर भर देत आहेत. त्यातून काही औषधं आणि लशींबाबत सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. त्यापैकीच एक आयव्हरमेक्टीन (Ivermectin) हे औषध. भारतात गोव्यात या औषधाला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी परवानगी देण्यात आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) या औषधाबाबत सावध केलं आहे.

आयव्हरमेक्टीन औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर उपचारासाठी करू नये, केवळ क्लिनिकल ट्रायल्ससाठीच करावा, असं डब्ल्यूएचओनं म्हटलं आहे. आयव्हरमेक्टीनच्या उपयुक्ततेबाबत जोपर्यंत पुरेसा डेटा (Data) जमा होत नाही तोपर्यंत या औषधाचा वापर केवळ क्लिनिकल ट्रायल्ससाठीच (Clinical Trials)केला जाईल, असं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलं आहे.

अशाच प्रकारचा इशारा जर्मन हेल्थकेअर आणि लाईफ सायन्स जाएंट मर्कने (Merck) देखील दिला आहे. याबाबत मर्कने म्हटलं आहे की, सध्या शास्त्रज्ञ कोरोनाच्या उपचारासाठी आयव्हरमेक्टीनचे उपलब्ध आणि उद्भवणारे परिणाम तसंच निष्कर्षांविषयी अभ्यासाची काळजीपूर्वक तपासणी करीत आहेत.

हे वाचा - कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक

तोंडावाटे घेण्याचे अँटिपॅरासायटिक औषध (Anti-Parasitic) आयव्हरमेक्टीनचा नियमित वापर केला तर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो, असं अमेरिकी जर्नल ऑफ थेरेप्युटिक्सच्या मे-जूनच्या अंकात सांगण्यात आलं होतं.

आम्ही आयव्हरमेक्टीनबाबत उपलब्ध आकडेवारीचे सर्वात व्यापक पुनरावलोकन केलं असल्याचं वैद्यकीय आणि वैज्ञानिकांच्या गटाचे प्रमुख आणि फ्रंट लाईन कोविड-19 क्रिटीकल केअर अलायन्सचे अध्यक्ष, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पेरी कोरी यांनी सांगितलं. आयव्हरमेक्टीन औषध ही महासाथ रोखू शकतं,असा निष्कर्ष काढण्यापूर्वी आम्ही पुनरावलोकन केलेल्या डेटाची योग्यता अतिउच्च मानकं लावत तपासली आहे.

जानेवारी 2021 मध्ये उपलब्ध झालेल्या 27 नियंत्रित चाचण्यांवर या अभ्यासाचे लक्ष्य केंद्रित होतं. त्यातील 15 या रँडमाईझ्ट कंट्रोल्ड ट्रायल्स (RCT) होत्या. आयव्हरमेक्टीन दिलेल्या कोरोना रुग्णांमध्ये मृत्यू दराचे प्रमाण, रिकव्हरीचा वेळ आणि व्हायरस क्लिअरन्समध्ये लेखकांना सांख्यकीय दृष्टीने मोठी घट आढळून आली. कोरोनापासून बचाव करू शकणाऱ्या आयव्हरमेक्टीन या औषधाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी 2500 रुग्णांसह 3 आरटीसी आणि 5 वेधशास्त्रीय नियंत्रित चाचण्यांचं विश्लेषण करण्यात आलं.

हे वाचा - Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत

आयव्हरमेक्टीनचा नियमित वापर केल्यास कोविड-19 संसर्गाचा धोका कमी होतो, असं या अभ्यासाअंती दिसून आल्याचं या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

First published: May 11, 2021, 8:33 PM IST

ताज्या बातम्या