जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील

Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील

Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील

Health Issues Due To Excess Of Salt: बाजारातून आणलेल्या चिप्स, पिझ्झा, टॅको आणि नमकीन यांसारख्या पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण जास्त वाढते. मीठ फक्त शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही वाढवू शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै : जेवणाची चव वाढवणारं साधं मीठ माणसाचे आयुष्य कमी करू शकते. ही गोष्ट आश्चर्यकारक वाटत असली तरी सत्य आहे. युरोपियन हार्ट जनरलच्या माहितीनुसार, 50 वर्षांनंतर जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने महिलांचे आयुष्य 1.5 वर्षे आणि पुरुषांचे आयुष्य 2.2 वर्षांनी कमी होऊ शकते. मिठात मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम आणि ब्रोमाइड मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात, परंतु मिठाचा जास्त वापर हानिकारक देखील ठरू शकतो. जेवणात वरून मीठ टाकल्याने शरीरात मीठ जास्त होईलच असे नाही. बाजारातून आणलेल्या चिप्स, पिझ्झा, टॅको आणि नमकीन यांसारख्या पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे शरीरात मिठाचे प्रमाण जास्त वाढते. मीठ फक्त शारीरिकच नाही तर मानसिक समस्याही वाढवू शकते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने शरीराचे काय नुकसान होऊ शकते ते जाणून (Health Issues Due To Excess Of Salt) घेऊया. जास्त मीठ आपले आयुष्य कमी करू शकते - मिठाच्या अतिसेवनामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी होतं. एव्हरी डे हेल्थच्या माहितीनुसार, जे लोक जास्त मीठ खातात त्यांना 75 वर्षांपूर्वी मृत्यू होण्याचा धोका 28 टक्के जास्त असतो. म्हणजेच जास्त मीठ खाल्ल्याने 100 पैकी एका व्यक्तीचा लवकर मृत्यू होऊ शकतो. स्ट्रोकचा धोका वाढतो - सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमध्ये लोक अधिक पॅकेज फूड किंवा रेडी टू इट फूड खाऊ लागले आहेत. या पॅकबंद पदार्थांमध्ये मीठ जास्त असते, त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो.

हे वाचा -  ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

मीठ देखील बीपी वाढवते - ज्या लोकांच्या बीपीमध्ये चढ-उतार होतात, त्यांनी मिठाचे सेवन जाणीवपूर्वक कमी करावे. विशेषत: उच्च बीपी असलेल्यांनी ठराविक प्रमाणातच मीठ घ्यावे. अधिक मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. मूत्रपिंडाच्या समस्या - जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात लघवीद्वारे पाणी जास्त प्रमाणात बाहेर पडू लागते, ज्यामुळे किडनीवर जास्त ताण येतो. वयाबरोबर किडनी कमकुवत होऊ लागते आणि अनेक समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा -  डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात