मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुमचं फुफ्फुस किती हेल्दी आणि स्ट्राँग आहे? घरच्या घरीच अशी करा Lung test

तुमचं फुफ्फुस किती हेल्दी आणि स्ट्राँग आहे? घरच्या घरीच अशी करा Lung test

कोरोनाव्हायरस आपल्या फुप्फुसांवर गंभीररित्या परिणाम करत आहे.

कोरोनाव्हायरस आपल्या फुप्फुसांवर गंभीररित्या परिणाम करत आहे.

कोरोनाव्हायरस आपल्या फुप्फुसांवर गंभीररित्या परिणाम करत आहे.

  मुंबई, 21 जुलै : कोरोना विषाणूचा संसर्ग (Coronavirus) नाका-तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो आणि सर्वात आधी तो फुफ्फुसांवरच (Lung) हल्ला करतो. कोरोनाची लक्षणं दिसत नसली तर कोरोनाव्हायरस फुफ्फुस (Coronavirus effect on lung) पोखरून काढत असतो. त्यामुळे फुफ्फुसाची चाचणी करणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रत्येक वेळी तुम्ही डॉक्टरकडे चाचणी करण्यासाठी जाऊ शकत नाही. पण डॉक्टरकडे जाण्याआधी तुम्ही घरच्या घरीही अगदी तुमच्या फुफ्फुसाची टेस्ट (Lung test) करू शकता.

  झायडस हॉस्पिटलने फुप्फुसांच्या क्षमतेची टेस्ट घेण्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. ज्याद्वारे तुम्ही अगदी घरच्या घरी तुमचं फुफ्फुस किती निरोगी आणि मजबूत आहे हे तपासू शकता.

  या व्हिडिओत मध्यभागी एका गोलात फुप्फुसांचं चित्र दर्शवलं आहे. व्हिडिओ प्ले केल्यानंतर काउंटडाउन सुरू होतं आणि त्यानंतर त्या मोठ्या गोलाभोवती एक छोटा लाल बॉल फिरू लागतो. टेस्ट करत असलेल्या व्यक्तीने तो बॉल फिरू लागेल त्या क्षणी श्वास रोखून धरायचा आहे. तो बॉल किती वेळा फिरतो आहे याचे आकडे तिथे दिसत जातात. त्या बॉलच्या किती फेऱ्या होईपर्यंत आपण श्वास रोखून धरू शकतो, यावर त्या टेस्टचा निकाल अवलंबून असतो.

  हे वाचा - वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेमुळे वाढतोय ‘आय स्ट्रेन’चा त्रास, हे उपाय करून पाहा

  बॉल दोन वेळा फिरून होईपर्यंत तुम्ही श्वास रोखून धरू शकलात, तर तुमची फुप्फुसं नॉर्मल अर्थात सर्वसामान्य स्थितीत आहेत, असं समजलं जातं. पाच फेऱ्या होईपर्यंत श्वास रोखू शकलात, तर तुमची फुप्फुसं कणखर आहेत, असं समजलं जातं. तसंच ज्या व्यक्ती लाल बॉलच्या 10 फेऱ्या होईपर्यंत श्वास रोखून धरून ठेवू शकतील त्या व्यक्तींची फुप्फुसं अति कणखर आहेत, असं समजलं जातं.

  मात्र ही टेस्ट केवळ अंदाज देण्यासाठी आहे. केवळ ही टेस्ट पाहून कोणतेही उपचार स्वतःच्या मर्जीने सुरू करू नयेत. श्वास घ्यायला त्रास होत असेल, तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते.

  कोरोनाचा फुफ्फुसावर गंभीर परिणाम

  कोरोना संसर्ग झाल्याची पहिली लक्षणं सर्दी, घसा खवखवणं, खोकला आणि ताप अशा प्रकारची असतात. ज्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) चांगली असते, अशांना एक तर ही लक्षणं (Symptoms) दिसतच नाहीत किंवा दिसली तरी ती सौम्य (Mild) प्रमाणात दिसतात आणि ती मंडळी बरीही होतात. काही जणांनी सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं आणि दुर्दैवाने त्यांची प्रतिकारशक्ती चांगली नसेल, तर विषाणू घशातून फुप्फुसांपर्यंत पोहोचतो आणि मग पुन्हा आजाराची तीव्रता वाढू लागते. ताप जास्त येतो किंवा खोकला वाढतो. यासाठी पाच-सात दिवस लागतात. त्यावेळी कोरोना टेस्ट केली तर कदाचित ती निगेटिव्ह येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण घशातून विषाणूचं अस्तित्व कमी झालेलं असतं; मात्र विषाणूचा संसर्ग फुप्फुसांत वाढलेला असतो. मग तो रुग्ण अत्यवस्थ होतो, वेळेत निदान झालं नाही तर मृत्युमुखीही पडू शकतो. म्हणूनच वेळेत टेस्ट करणं सर्वांत महत्त्वाचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली फुप्फुसं मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच योगासनं आणि प्राणायाम नियमितपणे करण्याचा सल्ला दिला जात आहे.

  हे वाचा - कोरोनानंतर आणखी एका व्हायरसचा देशात पहिला बळी; 18 दिवसात 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

  कोरोनाचा संसर्ग फुप्फुसांपर्यंत पोहोचला आहे की नाही, हे तपासण्यासाठी HRCT हा सीटी स्कॅन (CT SCAN) केला जातो. त्यातून निदान झालं, की पुढचे उपचार सुरू करता येतात.

  First published:
  top videos

   Tags: Health, Lifestyle, Test