Home /News /lifestyle /

धुवून वापरता येणारं कापडी डबल लेअर मास्क किती सुरक्षित? संशोधनातून समोर आल्या फायद्याच्या गोष्टी

धुवून वापरता येणारं कापडी डबल लेअर मास्क किती सुरक्षित? संशोधनातून समोर आल्या फायद्याच्या गोष्टी

दुहेरी लेअर असलेलं कापडी मास्क धुऊन पुन्हा वापरता येतात आणि वर्षभर कोरोनापासून (Particles) माणसाचं संरक्षण होऊ शकतं.

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : अनेक राज्यांमध्ये कोरोना (Corona) संसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन करणं, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणं आणि लसीकरण (Vaccination) या तीन बाबींचा अवलंब करणं महत्त्वाचं ठरत आहे. सध्या बाजारात विविध प्रकारचे मास्क (Mask) उपलब्ध आहेत. मास्कचे प्रकार बघता नेमका कोणता मास्क वापरणं गरजेचं आहे, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. अनेक जण धुऊन वापरता येणारे दुहेरी लेअरचे कापडी मास्क (Two Layer Cotton Mask) वापरण्यावर भर देतात. हे कापडी मास्क पुरेसे सुरक्षित आहेत का, असाही प्रश्न विचारला जातो. याबाबत कोलोरॅडो युनिव्हर्सिटीने (Colorado University) संशोधन केलं असून, त्याचे निष्कर्ष `एरोसॉल अँड एअर क्वालिटी रिसर्च` या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. दैनिक भास्करने दिलेल्या माहितीनुसार, दुहेरी लेअर असलेल्या कापडी मास्कने तोंड आणि नाक पूर्णपणे झाकलं जातं. त्यामुळे कोणत्याही साध्या कापडाच्या तुलनेत हे मास्क अधिक सुरक्षित आहेत. हे मास्क धुऊन पुन्हा वापरता येतात आणि वर्षभर कोरोनापासून (Particles) माणसाचं संरक्षण होऊ शकतं. दोन लेअर असलेला कापडी मास्क वर्षभरानंतरही बदलण्याची गरज नाही, असा दावा `एरोसॉल अँड एअर क्वालिटी रिसर्च` या नियतकालिकातल्या लेखात करण्यात आला आहे. मास्क सैल असेल, तर श्वासोच्छ्वासादरम्यान हवेतले 50 टक्के कण नाक आणि तोंडापर्यंत पोहोचतात, असं मास्कबाबत यापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं होतं. त्यामुळे मास्क वापरताना तो चेहऱ्यापासून दूर असू नये. मास्कने चेहऱ्याचा भाग योग्य पद्धतीने झाकला जावा. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असतो. त्यामुळे या आकारमानानुसार मास्कचं फिटिंग असावं. तसंच मास्क एकदा लावल्यावर तो सारखा खाली-वर करू नये, असं कोलोरॅडो युनिव्हर्सिटीतल्या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

फक्त गाजर खाणं पुरेसं नाही; डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे पदार्थसुद्धा खायला हवेत

मास्क तयार करताना वापरलेलं कापड विषाणूचे कण किती प्रमाणात रोखू शकतं, यावर मास्कचा दर्जा अवलंबून असतो. कापडी मास्क 0.3 मायक्रॉन असलेले बारीक कण 23 टक्क्यांपर्यंत रोखू शकतात. त्या तुलनेत चेहऱ्यावर लावलेलं कापड या कणांपासून केवळ 9 टक्क्यांपर्यंत संरक्षण करण्यास सक्षम असतात. सर्जिकल मास्कमध्ये (Surgical Mask) हे कण रोखण्याची क्षमता 42 ते 88 टक्क्यांपर्यंत असते. सर्जिकल मास्कवर कापडी मास्क लावला तर त्यामुळे 40 टक्क्यांपर्यंत सुरक्षा मिळते. केएन-95 आणि एन-95 हे मास्क एअरबॉर्न कणांपासून 83 ते 99 टक्क्यांपर्यंत संरक्षण देत असल्याचं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. कोलोरॅडो युनिव्हर्सिटीतल्या संशोधक मेरिना वेंस यांनी सांगितलं, की कोरोना (Pandemic) सुरू झाल्यापासून दररोज सुमारे 7200 टन मेडिकल वेस्ट (वैद्यकीय कचरा) (Medical Waste) निर्माण होत आहे. यात डिस्पोजेबल मास्कचं प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे धुऊन वापरता येणारे मास्क किती सुरक्षित आहेत, याबाबत आम्ही संशोधन केलं. संशोधनावेळी तपासणी करताना एक मास्क स्टिलच्या नळीवर लावण्यात आला. त्यानंतर नळीच्या एका बाजूनं हवा आणि एअरबॉर्न पार्टिकल्स सोडण्यात आले. हा मास्क आर्द्रता असलेल्या वातावरणात आणि तापमान कमी-अधिक होत असताना किती कण रोखू शकतो हे तपासण्यात आलं.

आता काखेतून कोरोनाचं निदान; घाम सांगणार तुम्हाला संसर्ग आहे की नाही

दुहेरी लेअर असलेला कापडी मास्क कितीही वेळा धुतला, तरी त्याच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही आणि तो पूर्णपणे सक्षम राहतो, असं संशोधनांती स्पष्ट झाल्याचं वेंस यांनी सांगितलं. दुहेरी लेअर असलेला कापडी मास्क वापरणं योग्य असल्यास यामुळे दुजोरा मिळतो. यामुळे वैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
First published:

Tags: Face Mask, Mask

पुढील बातम्या