मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? Google वर भारतीयांनी केला या प्रश्नाचा सर्वाधिक सर्च

पॉप स्टार रिहाना मुस्लीम आहे का? Google वर भारतीयांनी केला या प्रश्नाचा सर्वाधिक सर्च

पॉप स्टार रिहानाच्या (Rihanna) शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ट्वीटनंतर तिच्याविषयी भारतीयांच्या मनात उत्सुकता निर्माण झालेली दिसते. तिच्याबद्दल कायकाय Google वर शोधलं जातंय पाहा..

  • Published by:  News18 Desk

हैद्राबाद, 4 फेब्रुवारी : गुगलच्या (google) ट्रेंड्सवरून कळत असतं, की जगभरात कुठले नेटकरी (internet users) काय सर्च करतात. सध्या पॉप स्टार रिहानानं केलेलं ट्विट (tweet by Rihanna) ही सर्वाधिक सर्च केलेली गोष्ट आहे असं गूगल ट्रेंड्स (google trends) सांगत आहेत. Is rihanna a muslim (रिहाना मुसलमान आहे का?)  आणि Is rihanna from Pakistan ? (रिहाना पाकिस्तानी आहे का?) हे दोन प्रश्न Google वर सर्वाधिक शोधले गेले आहेत.

3 फेब्रुवारीला या ग्रॅमी अवॉर्ड विजेत्या गायिकेनं CNN चा शेतकरी आंदोलनाबाबतचा (farmer protest) एक लेख शेअर केला. सोबतच 'आपण याबाबत का बोलत नाही आहोत?' असं Tweet सुद्धा केलं. यानंतर लोकांनी लगोलग रिहानाला गुगलवर सर्च (search) करणं सुरू केलं.

गुगलच्या 'interest over time' या विभागात एखाद्या विषयासंबंधीच्या सर्चबाबतचा तपशील दिला जातो. यात दिसलं, की 3 फेब्रुवारीला रात्री 12.30 वाजता रिहानाबाबत सर्वाधिक शोध घेतला गेला. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात हा शोध सतत सुरूच राहिला.

सर्च केलेल्या विषयांमध्ये रिहानाची एकूण संपत्ती, तिचं ट्विटर अकाउंट, इन्स्टाग्राम अकाउंट, रिहाना इंडिया फार्मर, फार्म टॉपिक, कंगना रनौत असे अनेक विषय होते. भारताच्या विभागवार हा शोध पहायचा झाल्यास यात मेघालय (100%) , दादरा आणि नगर हवेली (87%) पंजाब (69%) चंदिगढ (68%) आणि दिल्ली (67%) आहेत.

हे PHOTO पाहा - शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत गदारोळ उठवणारी रिहाना हॉट पॉप स्टार की फेमिनिस्ट?

याशिवाय भारतात याखालोखाल शोधलं गेलेलं नाव राहिलं, ते 18 वर्षांची स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिचं. जागतिक पातळीवर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी (celebrities) भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. ग्रेटा त्यापैकीच एक आहे. ट्रेंड्स सांगतात, की भारतीयांनी 3 फेब्रुवारीला रात्री 11.30 वाजता ग्रेटा कोण आहे हे गूगलवर शोधायला सुरवात केली. बहुतांश सर्चेस हे दिल्ली, चंदिगढ, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब इथून केले गेले.

First published:

Tags: Farmer protest, Google, Greta Thunberg, Pop star, Protesting farmers