एखाद्याला हर्निया आहे, हर्नियाचं ऑपरेशन झालं असं आपण ऐकलंच आहे. आपल्यापैकी कुणाला कुणाला तरी हर्निया झाला आहे. मात्र तो नेमका कशामुळे होतो, याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. याबाबत मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील जनरल आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी याची कारणं सांगितली आहेत.
शरीरातील नैसर्गिक किंवा अनैसर्गिक छिद्रांतून एखादा अवयव, इंद्रिय किंवा त्या अवयवाचा भाग बाहेर येणं म्हणजे हर्निया.
मांसपेशींचा कमकुवतपणा हे सामान्य कारणात सामील होतं. पोटाचे स्नायू जन्मतः कमजोर असल्यास उतारवयात जांघेत हर्नियाचा फुगा तयार होतो.