जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Health Tips : चिकन खाल्ल्यानंतर दूध पिणं सुरक्षित आहे का? हा आहे आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला

Health Tips : चिकन खाल्ल्यानंतर दूध पिणं सुरक्षित आहे का? हा आहे आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला

Health Tips : चिकन खाल्ल्यानंतर दूध पिणं सुरक्षित आहे का? हा आहे आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला

प्रत्येक खाद्यपदार्थाचे फायदे आहेत. परंतु काही कॉम्बिनेशन असे असतात जे आपल्या पचनक्रियेस आणि एकूणच आरोग्यासाठी चांगले चांगले नसतात (Bad Food Combinations).

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : दुधात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आणि कॅल्शियम असते. याचे अनेक आरोग्य फायदे आहेत आणि ते अत्यंत पौष्टिक आहे. मात्र तरीदेखील तज्ञांच्या मते, मांसाहारी पदार्थांसोबत दुधाचे सेवन कधीही करू नये. प्रत्येक पदार्थांचे फायदे आहेत. परंतु काही फूड कॉम्बिनेशन आपल्या पचनक्रियेस आणि एकूणच आरोग्यासाठी चांगले नसतात (Bad Food Combinations). डॉ. निकिता कोहली, आयुर्वेदिक तज्ञ यांनी याविषयी सविस्तर माहिती (Ayurveda Expert Advice) दिली आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञ निकिता कोहली (Ayurvedic expert Dr Nikita Kohli) यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या मांसाहार आणि दूध एकत्र मिसळल्यावर काय होते (Consume Milk After Eating Chicken) याबद्दल सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मांसाहार घेतल्यानंतर लगेच दूध पिल्यास त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या, सोरायसिस आणि त्वचारोगासारखे विकार होऊ शकतात.

Parenting Tips : पालकांमध्ये असतील हे विशेष गुण, तर मुलं होतील यशस्वी आणि जबाबदार

त्यांनी कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “वेगवेगळ्या पाचक वातावरणाची आवश्यकता असलेले अन्न वेगळेपणे खाणे आवश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले, आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीने योग्य वेळी अन्नाचे योग्य मिश्रण खाणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, कफ, वात आणि पित्त या तीन दोषांचे असंतुलन आहे, जे एखाद्याच्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात." या व्यतिरिक्त त्यांनी असेही सांगितले की, “दूध आणि मांसाहार हे एक वाईट फूड काँबिनेशन आहे. कारण दुधाची पचन प्रक्रिया चिकनच्या पचनापेक्षा भिन्न असते ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात. दूध आणि चिकन एकत्र खाल्ल्याने शरीरात विषारी पदार्थ तयार आणि जमा होतात. दुसरीकडे, चिकन काही लोकांसाठी पचायला जड असू शकते आणि पोटात रिलीज झालेल्या अ‍ॅसिडमुळे पचन प्रक्रियेवर गंभीर भार पडू शकतो.” वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजर त्यांनी पुढे सांगितले, “या कॉम्बिनेशनमुळे दीर्घकाळात प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. यामुळे पोटदुखी, मळमळ, अपचन, गॅस, गोळा येणे, अल्सर, दुर्गंधी, बद्धकोष्ठता, अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि अनेक त्वचेचे विकार यांसारख्या पोटाशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो.” त्यामुळे हे दोन्ही पदार्थ स्वतंत्रपणे किंवा दोन तासांच्या अंतरानंतर खाणे सुरक्षित असते. (सदरील माहिती एका व्यक्तीच्या मतावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत तथ्यांच्या 100% अचूकतेची हमी देत ​​नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात