मुंबई, 7 जुलै : मुलांचं संगोपन करणं ही खूप मोठी जबाबदारी असते. अनेकवेळा पालकांसाठी ते आव्हान बनून जातं. नोकरी घर आणि मुलं अशा जाबदाऱ्या सांभाळणाऱ्या पालकांना मुलांकडे विशेष लक्ष देता येत नाही. परंतु काही गोष्टी जाणीवपूर्वक जाणून घेतल्या, समजून त्याचा अवलंब केला. तर पालकांसाठी मुलांचं संगोपन करण्यात (Parenting Tips) खूप मदत होते. अशा काही सवयी किंवा गुण असतात जे पालकांमध्ये असले (Special Qualities In Parents) तर त्यांची मुले आयुष्यात खूप यशस्वी आणि त्याचबरोबर एक जबाबदार नागरिक बनतात. जाणून घेऊया असे कोणते गुण आहेत जे पालकांमध्ये असावे. नीटनेटकेपणा आणि सभ्यपणा (Neatness And Decency) पालकांनी घरात मुलांसाठी आनंदी आणि आरामदायक वातावरण तयार केले पाहिजे. मुले सभोवताली घडणाऱ्या गोष्टींमधून शिकतात. त्यामुळे पालकांनी मुलांसमोर चांगले उदाहरण ठेवले पाहिजे. तुम्ही मुलाशी दयाळूपणे वागले पाहिजे आणि त्यांच्यासमोर असभ्य वर्तन करणे टाळले पाहिजे. कारण मुलं तुमच्याकडे पाहून सर्व गोष्टी शिकत असतात. जर तुमचे मूल दयाळूपणा दाखवत असेल किंवा एखाद्याला मदत करत असेल तर तुम्ही त्याची प्रशंसा केली पाहिजे. यामुळे मुलाला चांगली कामे करण्यास प्रोत्साहन मिळते.
हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकताय? वेळ निघून जाण्यापूर्वी व्हा सावधखंबीर राहणारे आणि धीर देणारे (Strong And Patient Parent) पालकांना वेळोवेळी त्यांची मुले कोणत्या परिस्थितीतून जात आहेत कळायला हवं. दररोज मुलांशी बोला आणि काही चुकीचे वाटल्यास त्वरित कारवाई करा. जर तुमच्या मुलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाल्या असतील. तर मुलांना या परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत करा. त्यांना सांगा की तुम्ही प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत आहात. तुमचे प्रेम आणि पाठिंबा मुलांना धैर्य देईल आणि नकारात्मक भावना सकारात्मकतेमध्ये आणि आशेमध्ये बदलतील.
वीज बिल निम्म्यावर आणू शकतात हे उपाय; AC वापरताना या गोष्टींवर ठेवा नजरभावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या संगोपनासाठी भाषा, गणित आणि संगीत बुद्धिमत्तेप्रमाणेच भावनिक बुद्धिमत्तादेखील महत्वाची आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या भावना सकारात्मक पद्धतीने समजून घेऊ शकता. तणाव कमी करणे, नीट बोलणे, इतरांना समजून घेणे, समस्या सोडवणे आणि त्यातून बाहेर पडणे यात मदत होते. जेव्हा तुम्ही मुलाला दयाळू बनवण्याचा प्रयत्न कराल (Parent Children Relationship) तेव्हा त्यांच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न करा. याद्वारे मुलं केवळ त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या भावनादेखील समजून घेण्यास सक्षम होतील. परिस्थितीनुसार त्यांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण कसे ठेवायचे हे समजेल.