मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Potato cause weight gain : बटाटा खाल्ल्याने खरंच आपण Fat होतो का?

Potato cause weight gain : बटाटा खाल्ल्याने खरंच आपण Fat होतो का?

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त प्रमाणात कॅलरीज वाढतात, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांनी बटाटा फार कमी प्रमाणात खा.

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे जास्त प्रमाणात कॅलरीज वाढतात, ज्यामुळे लठ्ठपणा येतो. वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्यांनी बटाटा फार कमी प्रमाणात खा.

वजन वाढेल या भीतीने बटाट्याचे पदार्थ खाणं टाळलं जातं.

मुंबई, 21 नोव्हेंबर : बटाट्याची (Potato) भाजी (Potato sabhi) ही अशी भाजी (Aloo sabji) आहे जी किती तरी जणांना आवडते. बटाटा वडा (Batata vada) किंवा वडापाव (Vada pav) म्हटलं की कित्येकांच्या तोंडाला पाणीच सुटतं आणि फ्रेंच फ्राइझ (French fries) तर काय बहुतेकांचा फेव्हरेट स्नॅक्सच आहे. असा हा बटाटा (Benefits of potao), त्यापासून बनलेले पदार्थ कितीही आवडत असले तरी वजन वाढेल (Potato cause weight gain) या भीतीने खाणं टाळलं जातं (Side effects of potato).

बटाटा आणि वाढलेलं वजन हे जणू समीकरणच (Potato make you fat). एखादी लठ्ठ व्यक्ती दिसली की  अरे काय तू बटाट्यासारखा झाला आहेस असं म्हणत त्या व्यक्तीला बटाट्याचीच उमपा दिली जाते. लठ्ठ व्यक्तीची फक्त बटाट्याशी तुलनाच नाही तर बटाटा खाल्ल्याने लठ्ठ व्हायला होतं, असंही सांगितलं जातं. पण खरंच  बटाट्याने वजन वाढतं का, बटाट्यामुळे आपण लठ्ठ होतो का?

डॉ. सिद्धार्थ भार्गव यांनी याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

हे वाचा - वजन कमी करण्याचा केलाय पक्का प्लॅन; मग या 'लो बजेट' गोष्टी येतील कामी

डॉ. सिद्धार्थ भार्गव यांनी सांगितलं, बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे. हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे. पण बटाट्यामुळे तुम्ही फॅट होत नाही कोणत्याच घटकामध्ये वजन वाढवण्याची आणि घटवण्याची क्षमता नसते. तुम्ही बटाटा कसा खाता यावर सर्व अवलंबून आहे.

उदाहरणार्थ तुम्ही दिवसातून एकदा बटाट्याची भाजी खाल्ली तर काहीच हरकत नाही. पण बटाट्याची भाजी तुम्ही फ्राइझप्रमाणे खाल त्यासोबत तुम्ही मोठा बर्गर आणि एक ग्लासभर मिल्कशेक प्यायलात. त्यानंतर पोटॅटो फ्राइझमुळे वजन वाढलं, असं म्हणाल तर ते चुकीचं आहे, असं ते म्हणाले.

हे वाचा - आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण

त्यामुळे तुम्हालाही बटाट्याचे पदार्थ आवडत असतील तर वजन वाढेल या भीतीने खाणं टाळू नका. डॉ. भार्गव यांनी नेमकं काय सांगितलं ते लक्षात ठेवा आणि बटाट्याचे पदार्थ मनसोक्त खा.

First published:

Tags: Food, Health, Lifestyle, Weight, Weight gain