• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण

Fruit with Meals: आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळे का खायची नसतात, जाणून घ्या त्याचे कारण

आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यक पद्धतीनुसार, प्रत्येक अन्न एका विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट वेळी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मांसाहारी जेवणासोबत दुग्धजन्य पदार्थ किंवा जेवणासोबत फळं खाऊ नयेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : उत्तम आरोग्यासाठी दिवसातून फळं (Fruit) आणि भाज्या (Vegetable) खाव्यात, असं सांगितलं जातं. फळं आणि काही भाज्या कच्च्या खाणं आरोग्यासाठी चांगलं ठरतं. तसंच, या फळं आणि भाज्या शक्यतो कोणतीही प्रक्रिया न करता खाणं (कापून बारीक तुकडे करणं, मिक्समध्ये फिरवणं किंवा ज्यूस/ मिल्क शेक बनवणं आदी) आरोग्यासाठी आणि पचनशक्ती चांगली राहण्यासाठी उपयुक्त आहे. फळं शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखण्यास आणि आरोग्य चांगलं राहण्यास तसंच, वजन नियंत्रित राहण्यास मदत करतात. परंतु फळं खाण्याचे हे फायदे मिळविण्यासाठी, तुम्हाला ते योग्य वेळी खाणे आणि योग्य प्रकारे खाणं आवश्यक आहे. आयुर्वेद या प्राचीन भारतीय वैद्यक पद्धतीनुसार, प्रत्येक अन्न एका विशिष्ट पद्धतीनं आणि विशिष्ट वेळी खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मांसाहारी जेवणासोबत दुग्धजन्य पदार्थ किंवा जेवणासोबत फळं खाऊ नयेत. अशा प्रकारे खाणं आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे, असं आयुर्वेदात सांगण्यात आलंय. 1. फळं इतर कोणत्या आहारासोबत का खाऊ नयेत? इतर कोणत्याही अन्नापेक्षा फळं लवकर पचतात. तर, इतर अन्न पचण्यास जास्त वेळ लागतो. फळं इतर अन्नासोबत खाल्ल्यास हे सर्व अन्न पचेपर्यंत ते पोटातच राहतं आणि त्यातील फळांपासून तयार झालेले शरीरासाठी आवश्यक पोषकद्रव्यं शोषून घेण्याची प्रक्रिया होऊ शकत नाही. अशा वेळी पोटातील इतर अन्नासाठी एकत्र आलेल्या पाचक रसांमुळं फळांतील घटक द्रव्यं आंबण्यास सुरुवात होते. हे शरीरासाठी हानिकारक असून यामुळं रोग उद्भवू शकतात. याशिवाय दूध आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसह फळं खाल्ल्यानं त्वचेवर मुरुम, सोरायसिस आणि एक्जिमासारख्या समस्या उद्भवू शकतात. 2. फळं का शिजवू नयेत? फळांमध्ये अग्नीशी संबंधित ऊर्जा दर्शवतो. ती नैसर्गिक स्थितीत खाल्ल्यास पाचन अग्नीला उत्तेजित करतात. यामुळं पचनक्रिया आणि पोट मजबूत होते. फळं शिजवल्यानं यातील पाचक अग्नीला उत्तेजित करणाऱ्या आणि निरोगी पोषक तत्त्वांचा नाश होतो. त्यामुळे शिजवलेली फळं खाल्ल्यानं काहीच फायदा होत नाही. हे वाचा - भावी पत्नीला अश्लील मेसेज पाठवणं गुन्हा? त्या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल 3. फळं खाण्याची योग्य वेळ आयुर्वेदानुसार फळं खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. ही अशी वेळ असते, जेव्हा तुमचे पोट फळांमधून बहुतेक पोषक तत्त्वं शोषून घेतं. तसेच, सकाळी आणि व्यायामापूर्वी आणि नंतर साधं कार्बोहायड्रेटयुक्त अन्न सेवन करणं चांगलं. सूर्यास्तानंतर स्निग्ध पदार्थ, प्रथिनं आणि कमी जटिल कर्बोदकांचं सेवन करणं चांगलं. 4. आपण दिवसा फळं कधी खाऊ शकतो? तुमची भूक कमी करण्यासाठी तुम्ही ते तुमच्या दोन जेवणांदरम्यान अल्पोपाहार म्हणून फळं खाऊ शकता. जेवणांच्या दरम्यान फळं खाल्ल्यानं तुम्हाला आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळू शकतात आणि ती तुम्हाला आरोग्य बिघडण्यापासून देखील वाचवू शकतात. फळं खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी 11 च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 4 ही आहे. जर, तुम्ही तुमचा नाश्ता आणि दुपारचं जेवण उशिरा केलं असेल तर, फळं खाण्यासाठी 30 ते 40 मिनिटांनंतरची वेळ चांगली. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी खूशखबर! तुषार, ठिबक सिंचन आता 75 ते 80 टक्के अनुदानावर मिळणार; असा घ्या योजनेचा लाभ 5. सूर्यास्तापूर्वी फळांचे सेवन का करावे? संध्याकाळी फळं खाल्ल्यानं झोपेचं वेळापत्रक आणि पचनक्रिया बिघडते. म्हणूनच, आयुर्वेद संध्याकाळी 4 वाजण्यापूर्वी किंवा सूर्यास्तापूर्वी फळ खाण्याची शिफारस करतो. फळं ही साधी कर्बोदकं असतात. याचा अर्थ ती त्वरीत पचू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढवू शकतात आणि त्वरीत ऊर्जा प्रदान करतात. झोपेच्या वेळी रक्तातील साखरेची वाढ तुमच्या झोपेत व्यत्यय आणू शकते. तसंच सूर्यास्तानंतर आपली चयापचय क्रिया मंदावते आणि पचनसंस्थेला कार्बोहायड्रेट पचणं कठीण होतं. म्हणूनच, संध्याकाळी कर्बोदकांचं सेवन मर्यादित करणं चांगलं.
  Published by:News18 Desk
  First published: