मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाव्हायरसमुळे Diabetes चा धोका आहे का? संशोधनात समोर आली महत्त्वाची माहिती

कोरोनाव्हायरसमुळे Diabetes चा धोका आहे का? संशोधनात समोर आली महत्त्वाची माहिती

कोरोनाव्हायरस आणि डायबेटिस याबाबत संशोधन करण्यात आलं आणि त्यात संशोधकांच्या हाती मोठी माहिती लागली आहे.

कोरोनाव्हायरस आणि डायबेटिस याबाबत संशोधन करण्यात आलं आणि त्यात संशोधकांच्या हाती मोठी माहिती लागली आहे.

कोरोनाव्हायरस आणि डायबेटिस याबाबत संशोधन करण्यात आलं आणि त्यात संशोधकांच्या हाती मोठी माहिती लागली आहे.

मुंबई, 02 जून : कोरोना हा डायबेटिस किंवा मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांसाठी घातक ठरत आहे. पण कोरोनामुळे डायबेटिस होऊ (Coronavirus and diabetes) शकतो का? असा प्रश्नही आता उपस्थित होतो आहे. कोरोना महासाथीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा विषाणूजन्य आजार केवळ फुफ्फुसाशी संबंधित असल्याचं समजलं जात होतं. मात्र आता कोरोना हा शरीरातील प्रणाली आणि विविध अवयवांवर देखील गंभीर परिणाम करत असल्याचं दिसून येत आहे.  SARS-COV-2 हा विषाणू पॅनक्रिया सोबत (Pancreas) इन्शुलिनची (Insulin) निर्मिती करणाऱ्या ग्रंथीना नुकसान पोहचवू शकतो, असा संशय काही डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

कोरोना रुग्णांचा केलेल्या अभ्यासात कोरोना रुग्णांमध्ये डायबेटिसचा धोका वाढत असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे. मेटॅबॉलिकशी (Metabolic) संबधित समस्यांकरिता कधी कधी अधिक पोषक अन्न सेवनाची गरज असते. मात्र त्यामुळे रुग्णांमध्ये डायबेटीसची लक्षणं दिसून येत आहेत. जे रुग्ण आधीपासून डायबेटीसने त्रस्त आहेत, अशा रुग्णांमध्ये आता सूज ही समस्या दिसून येत असल्याचं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. काही लहान मुलांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणं दिसताच डायबेटिसची देखील लक्षणं दिसून येत आहेत.

अमेरिकेतील वेटरन्स अफेअर्स सेंट लुईस हेल्थ केअर सिस्टीममधील एपिडोमोलॉजी सेंटरचे निर्देशक जियाद –अल एली यांनी सांगितलं की, कोरोनामुळे डायबिटीस होतो, यावर सुरुवातीला विश्वास ठेवणं कठीण होतं. परंतु आता तसं दिसून येत आहे. जियाद अल एली यांचा हा डेटा मागील महिन्यात नेचर नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला आहे. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा - मुंबईकरांनो कोरोना लस घेण्यापूर्वी वाचा ही बातमी; BMC ने दिली महत्त्वाची अपडेट

त्यांनी 3 आठवडे इंग्लंडमधील एका रुग्णालयात कोरोना संक्रमित 50,000 रुग्णांवर संशोधन केलं. यातील रुग्णांमध्ये डिस्चार्ज दिल्यानंतर सुमारे 20 दिवसांनंतर डायबेटीस होण्याची शक्यता 50 टक्क्यांनी वाढल्याचं आढळून आलं. कोरोना संसर्गापासून वाचलेल्या लोकांच्या तुलनेत ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला त्यांच्यामध्ये 6 महिन्यांत डायबेटीस होण्याचा धोका 39 टक्के वाढल्याचं त्यांना दिसून आलं. प्रत्येक 1000 रुग्णांमागे 6 रुग्णांना डायबेटीस होण्याचा धोका आहे.

जगभरातील सुमारे 500 डॉक्टरांनी लंडन येथील किंग्ज कॉलेजमध्ये मेटाबॉलिक आणि बेरिअॅट्रीक सर्जरी विभागाचे प्रमुख फ्रान्सेस्को रुबिनो यांच्या यांच्या डायबेटीज रजिस्ट्रीच्या माध्यमातून डेटा शेअर करण्याचं मान्य केलं आहे. आतापर्यंत या रजिस्ट्रीच्या माध्यमातून 350 केसेस दाखल झाल्या आहेत. या व्यतिरिक्त रुग्ण आणि त्यांच्या आई –वडीलांकडून येणाऱ्या ई-मेलच्या माध्यमातूनही प्रतिदिन याबाबत माहिती मिळत आहेत. यानुसार सुमारे 8 वर्ष वय असलेल्या मुलांना 2 महिन्यांपूर्वी संसर्ग झाला होता, त्यांना आता डायबेटीसचा त्रास जाणवत आहे. "आम्हाला 2 महामासाथीचा सामना करावा लागणार असं दिसत आहे", असं रुबिनो म्हणाले.

हे वाचा - आयुर्वेदाच्या मदतीने 600 रुग्ण कोरोनामुक्त; रामदेव बाबा-IMA वादावेळी मोठी अपडेट

संशोधकांनी कोविड डायबिटीसचा धोका वाढवणारे फॅक्टर्स शोधून काढले आहेत. पॅंनक्रियाजमधील इन्शुलिन उत्सर्जन करणाऱ्या बिटा पेशी (Beta Cells) या संसर्गामुळे किंवा संसर्गशी शरीर प्रतिकार करतं या दरम्यान नष्ट होत असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

हॉंगकॉंग विश्वविद्यालयाचे पॅथोलॉजीचे क्लिनिकल प्राध्यापक जॉन निकोल्स यांनी सांगितलं की, कोरोना रुग्णांना डायबेटिस होण्याची अनेक कारणं आहेत. संसर्गाविरोधात अॅक्युट स्ट्रेस रिस्पॉन्स (Acute Stress Response) किंवा रक्तात ब्लड शुगर वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या स्टेरॉईडसचा अधिक वापर तसंच डायबेटीस असल्याचं रुग्णांना माहिती नसणं.

परंतु, SARS-COV-2 या विषाणूमुळे डायबेटिस होतो, असं ठोसपणे म्हणणं मुश्किल आहे. मेलबर्न येथील बेकर हार्ट अँड डायबेटिज इन्स्टिट्यूटचे उपसंचालक जोनाथन शॉ यांनी सांगितलं, लोकसंख्येवर आधारित डेटानुसार डायबेटीस रुग्णांचा शोध घेण्यासाठी कोरोना महासाथीच्या तीव्रतेचा आधार घेता येऊ शकतो.

First published:

Tags: Coronavirus, Diabetes