मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

आयुर्वेदाच्या मदतीने बरे झाले 600 कोरोना रुग्ण; बाबा रामदेव - IMA चा वाद सुरू असतानाच मोठी अपडेट

आयुर्वेदाच्या मदतीने बरे झाले 600 कोरोना रुग्ण; बाबा रामदेव - IMA चा वाद सुरू असतानाच मोठी अपडेट

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये (All India Institute of Ayurveda ) शेकडो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये (All India Institute of Ayurveda ) शेकडो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये (All India Institute of Ayurveda ) शेकडो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 02 जून : योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association) यांच्यामध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथीवरून खडाजंगी रंगलेली आहे. त्यांच्यातील वाद सध्या चर्चेत असतानाच आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ते म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदामध्ये (All India Institute of Ayurveda ) शेकडो कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत.

कोरोना रुग्णांवर सध्या वेगवेगळ्या औषधांनी आणि वेगवेगळ्या पद्धतीने उपचार देण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाने (AIIA) आपण कमीत कमी 600 कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले, असं सांगितलं आहे.

आयुर्वेद, अ‍ॅलोपॅथी आणि आधुनिक निदान तंत्रज्ञान याच्या एकत्रिकरणामुळे हे शक्य झालं आहे, असं ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या संचालकांनी सांगितलं आहे.

बाबा रामदेव यांचाही आयुर्वेदाने कोरोना रुग्ण बरं केल्याचा दावा

कोरोनातून देशाला वाचवण्यात डॉक्टरांचं मोठं काम आहे, हे मी मान्य केलं आहे, पण तसं असलं तरी 90 टक्के रुग्ण बरे करणाऱ्या आयुर्वेदाला कमी लेखण्याचं काम करू नये असं बाबा रामदेव म्हणाले. बाबा रामदेव यांनी 90 टक्के कोरोना रुग्ण योग आयुर्वेदाच्या मदतीने ठीक झाल्याचा दावा केला होता. 90 टक्के रुग्ण प्राणायाम करून बरे झाल्याचा पुनरुच्चान त्यांनी केला.

हे वाचा - रामदेव बाबांचा नवा दावा, आता ब्लॅक फंगसवरील आयुर्वेदिक औषध करणार लॉन्च

या दाव्यानंतर कोरोना रुग्णांची जबाबदारी बाबा रामदेव यांनी घ्यावी असं आव्हान आयएमएनं दिलं होतं. त्यावर व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णांना डॉक्टरांनी सांभाळावं इतर सर्वांच्या उपचाराची मी जबाबदारी घेतो असा दावा रामदेव बाबांनी केला.

अ‍ॅलोपॅथीबाबत काय म्हणाले होते बाबा रामदेव?

योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अ‍ॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. लशीचे दोन डोस घेऊन डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यांच्या या विधानांमुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला. बाबा रामदेव यांत अब्रूनुकसानीचा दावा ठोकला.  केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी देखील याप्रकरणी हस्तक्षेप केला होता. यासंदर्भात त्यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहून रामदेव बाबांना वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं होतं.

हे वाचा - अरे बापरे! फंगसनंतर आता गँगरीनचा धोका; कोरोना रुग्णांवर नवं संकट

आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरू रामदेव यांची तशी भावना नसल्याचं सांगितलं. तसंच न्यूज 18 च्या विशेष मुलाखतीत बोलताना बाबा रामदेव यांनी हा वाद संपवण्याची मनापासून इच्छा असल्याचं म्हटलं आहे. ही वेळ स्वार्थ सोडून लोकांचा विचार करण्याची आहे. उपचारासाठी लाखो रुपये खर्च करण्याची ऐपत नसणाऱ्यांबाबत विचार करावा असंही बाबा रामदेव म्हणाले. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी रामदेव बाबांनी माफी मागत असल्याचं म्हटलं.

First published:

Tags: Ayurved, Baba ramdev, Coronavirus