जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Clove in Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्याविषयी माहिती

Clove in Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्याविषयी माहिती

Clove in Diabetes: मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग फायदेशीर आहे का? जाणून घ्या त्याविषयी माहिती

लवंग खाल्ल्याने यकृत, रक्तातील साखरेची पातळी, पोटातील अल्सर यासह अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. लवंग अनेक रोगांवर औषध म्हणून देखील वापरली जाते. जाणून घेऊया लवंग खाण्याचे काय (Clove Beneficial for Diabetic) फायदे आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 मे : खराब जीवनशैलीमुळे मधुमेह, पोटाचे विकार, दात, हाडे यासह साखरेच्या समस्यांनी बहुतांश लोक त्रस्त आहेत. या आजारांना सामोरं जाण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय देखील करतात. परंतु, तरीही अनेकांना यावर चांगला गुण येत नाही. आपल्या स्वयंपाकघरातील भाज्यांची चव वाढवण्यासाठी लवंगा किती उपयुक्त आहेत, हे कोणाला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. या समस्यांवर लवंग (Clove) फायदेशीर ठरू शकते. असे मानले जाते की लवंग खाल्ल्याने यकृत, रक्तातील साखरेची पातळी, पोटातील अल्सर यासह अनेक आजारांमध्ये आराम मिळतो. लवंग अनेक रोगांवर औषध म्हणून देखील वापरली जाते. जाणून घेऊया लवंग खाण्याचे काय (Clove Beneficial for Diabetic) फायदे आहेत. मधुमेहामध्ये लवंगचे फायदे - झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, मधुमेहामध्येही लवंग खूप फायदेशीर आहे. लवंगामध्ये नायजेरीसिन असते, जे आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणजेच मधुमेहाच्या रुग्णांनी लवंगाचे सेवन अवश्य करायला हवे. लवंगात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट - लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. लवंग खाल्ल्याने विविध प्रकारचे इन्फेक्शन आणि बॅक्टेरियापासून संरक्षण मिळते. त्यात युजेनॉल नावाचे फायटोकेमिकल असते, जे ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळण्यासाठी उपयुक्त आहे. याच कारणामुळे लवंग खाण्याचा सल्ला दिला जातो. हे वाचा -  कोरफडीपासून घरीच तयार करा असा शॅम्पू; केस होतील शायनी, मिळेल नॅचरल ग्लो यकृतासाठी लवंग - वास्तविक, लवंगात युजेनॉल असते, जे आपले यकृत स्वच्छ करण्यास मदत करते. यामुळेच यकृताच्या आजारांमध्ये लवंग खूप उपयुक्त आहे. शक्य असल्यास चहा किंवा भाजीमध्ये लवंग टाकूनही खाऊ शकता. खोकला आणि घसा खवखवणे ही खूप सामान्य समस्या आहे. यावर लवंग फायदेशीर ठरू शकते. यासाठी तीन लवंग पाकळ्या बारीक करून पावडर बनवा आणि त्यात एक चमचा मध मिसळून खा. ही रेसिपी खोकला आणि घसा खवखवण्यापासून आराम तर देईलच, पण घशातील वेदना आणि संसर्ग दूर करण्यातही मदत करेल. हे वाचा -  उन्हाळ्याच्या दिवसातही शरीरात राहील भरपूर ताकद; ही 5 होममेड ड्रिंक्स घ्या यकृत डिटॉक्सिफाय मध आणि लवंग यांचे मिश्रण यकृत डिटॉक्स करण्यास देखील मदत करते. यासोबतच यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यासाठी तीन लवंगा घेऊन बारीक पावडर बनवा, नंतर त्यात एक चमचा मध मिसळून खा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात